अदा शर्माचे विचित्र अंदाजातील फोटो व्हायरल; विचारला असा प्रश्न की, नेटकरीही झाले हैराण


‘कमांडो’ फेम अभिनेत्री अदा शर्मा हिचा सोशल मीडियावर खूप वावर असतो. त्यामुळे प्रेक्षकांकडून नेहमीच तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत असतो. कोरोना महामारीमुळे तिच्या अनेक प्रोजेक्टचे काम लांबणीवर गेले आहे. सोशल मीडियावरील तिच्या फोटोमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता देखील तिचे एक लेटेस्ट फोटोशूट चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. तिचे हे फोटो आणि तिने विचारलेले प्रश्न यामुळे ती चर्चेत आहे. तिने अत्यंत विचित्र अंदाजात ड्रेस घातला आहे. तिचा हा लूक काहींना आवडला आहे, तर काहीजण तिला अनेक प्रश्न विचारत आहेत. (Adah Sharma’s latest photo viral on social media)

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अदा शर्माच्या नावाचा समावेश त्या कलाकारांमध्ये होतो, जे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. अदा नेहमीच मजेशीर अंदाजात अनेकवेळा काहीतरी वेगळेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे विचित्र फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. तिचे फोटो आणि तिने विचारलेला प्रश्न सर्वात चर्चेत आहे. तिचा हा प्रश्न पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

अदाने विचारलेल्या या प्रश्नावर आता युजर्स उत्तर देत आहेत. सोबतच आता सगळे तिला विचारत आहेत की, त्यांनी दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही? तसेच काहीजण तिला विचारत आहेत की, “तुला नक्की काय झालं आहे??” परंतु अदाला या ट्रोलिंगचा काहीही फरक पडत नाही.

अदाला अनेक ठिकाणी स्पॉट केले जाते. काही दिवसांपूर्वी ती तिच्या मास्कमुळे चर्चेत आली होती. अदा अत्यंत वेगळ्या पद्धतीने मास्क लावते. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

अदा शर्माने 2014 साली ‘हार्ट ॲटक’ या चित्रपटातून तेलुगु चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. यानंतर ती अल्लू अर्जुनसोबत ‘सन ऑफ सत्यमूर्ती’ या चित्रपटात दिसली होती. बॉलिवूडबाबत बोलायचे झाल्यास, तिने 2019 मध्ये ‘कमांडो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

अदा शर्माचे सोशल मीडियावर लाखोंमध्ये फॅन फॉलोवर्स आहेत. त्यामुळे तिच्या प्रत्येक फोटोला खूप प्रेम मिळत असते. कधी ती तिच्या पारंपरिक लूकने, कधी ग्लॅमरस लूकने, तर कधी बोल्ड लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तिचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. तिचे सोशल मीडियावर 5.5 मिलियन एवढे फॉलोवर्स आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आशुतोष पत्कीने शेअर केला जिममधला फोटो; पाहायला मिळाला बबड्याचा ‘फिट ऍंड फाईन’ लूक

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’


Leave A Reply

Your email address will not be published.