
या मुलाखतीमध्ये तिने सांगितले २०१९ साली तिचे पहिले गर्भपात झाले, तर लगेच पुढच्याच वर्षी २०२० साली दुसऱ्यांदा तिचे गर्भपात झाले. असे दोन गर्भपाताचे दुःख तिने सहन केले आहे. या दोन्ही गर्भपातावेळी ती तीन महिन्यांची प्रेग्नेंट होती. या दोन्ही गर्भपातावेळी हरभजन पावलोपावली तिच्यासोबत होता. यावेळी ती म्हणाली, “मान्य आहे की तीन महिन्यातच म्हणजे खूप सुरुवातीला असे झाले. पण तरीही एक आई तिच्या बाळाशी खूप जास्त प्रमाणात जोडली जाते. गर्भपात कितव्याही महिन्यात झाले तरी आईसाठी हे दुःख वेगळेच असते.”

ज्या महिलांनी हे दुःख सहन केले आहे, अशा महिलांना विश्वास देताना गीता म्हणाली, ” अशा स्त्रियांनी बिलकुल हार मानू नका. हो नक्कीच हे खरे आहे की गर्भपात तुमच्यावर मोठा आणि वाईट परिणाम सोडून जाते. पण आपण एक स्त्री आहोत याचा विचार करून हे सर्व विसरण्याचा प्रयत्न करावा आणि पुढे जावे.”
पुढे गीता म्हणाली, “मागचे दोन वर्ष माझ्यासाठी खूपच जास्त अवघड होते. मात्र मी स्वतःला तुटू दिले नाही. गर्भपात नंतर महिलांच्या शरीरात हार्मोन्स मोठ्या प्रमाणावर बदलतात, त्यामुळे स्वतःला सावरणे खूपच आवश्यक आहे. मी देखील स्वतःला खूप मजबूत केले. मला लग्नाआधीपासूनच दोन मुलं पाहिजे होते. जर सर्व नीट असते तर मला मुलगा हिनाया तीन वर्षाची असतानाच झाला असता. जेव्हा मी चौथ्यांदा प्रेग्नेंट राहिली तेव्हा मी योग देखील केला.” गीता तिच्या दुसऱ्या गर्भपातानंतर तिच्या सासरी पंजाबमध्ये गेली. तिथे सर्वानीच तिची खूप काळजी घेतली. गीतासाठी जोवान तिचे ‘रेनबो बेबी’ आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’











