हिंदी चित्रपट क्षेत्रातील आणि मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री चर्चेत राहण्यासाठी रोज नवीन काहीतरी क्लुप्या काढत असतात. या अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांपेक्षा अशा विवादास्पद वक्तव्यासाठीच जास्त प्रसिद्ध असतात. यामधीलच एक अभिनेत्री म्हणजे गहना वशिष्ठ . गहना वशिष्ठ तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे तर चर्चेत असतेच. त्याचबरोबर ती तिच्या विवादास्पद वक्तव्यामुळे ही नेहमीच चर्चेत असते. आताही गहनाने तिच्या सोशल मीडियावर अशी काही पोस्ट केली आहे ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले आहे. काय आहे हा सगळा प्रकार चला जाणून घेऊ.
सोशल मीडियावर विवादास्पद पोस्ट टाकून चर्चेत राहणे हा काही अभिनेत्रींचा आवडता छंद असतो. गहना वशिष्ठ सुद्धा त्याच अभिनेत्रींपैकी एक आहे. याआधी आपले न्यूड फोटो टाकून ती चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले आहे. कारण नुकतेच गहनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट करत “श्रीमंत बॉयफ्रेंड पाहिजे” अशी बातमी दिली होती. त्यावरूनच हा सगळा वाद रंगला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये गहनाने “मला घाई आहे, मला लवकरात लवकर बॉयफ्रेंड पाहिजे ते ही रात्री आठ वाजेपर्यंत मला त्याचे नाव समजले पाहिजे. त्यामुळे जे कोणी दिसायला सुंदर, तरुण आणि श्रीमंत असेल त्याने मला लवकर मेसेज करावा” असा संदेश दिला होता.
गहनाच्या या व्हायरल पोस्टवर नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत तिची खरडपट्टी केली आहे. एका युजरने यावर “भीक मागायची ही कोणती पद्धत आहे” असे म्हणत टिका केली आहे. तर आणखी एकाने “हे काय भाजी आणायला चालली आहेस का?” असा प्रश्न केला आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र वाद आणि गेहना हे प्रकरण काही नवीन नाही. याआधीही ती अनेकदा अशा पोस्टमुळे वादात सापडली आहे. विशेष म्हणजे बिगबॉसचा सिझन जवळ आला की ती अशा प्रकारे पोस्ट टाकून चर्चेत राहण्याचा ती नेहमीच प्रयत्न करत असते. मागच्या वर्षीही तिने अनेक कलाकारांबद्दल विवादास्पद वक्तव्ये करुन चर्चेत आली होती.