Saturday, September 12, 2026
Home टेलिव्हिजन खासगी चॉपरमधून एन्ट्री मारणाऱ्या राखी सावंतने स्वतःला युगांडाची प्रिन्सेस म्हणत दिली सर्वांना मोठी बातमी

खासगी चॉपरमधून एन्ट्री मारणाऱ्या राखी सावंतने स्वतःला युगांडाची प्रिन्सेस म्हणत दिली सर्वांना मोठी बातमी

मनोरंजनविश्वातील सर्वात मोठी ड्रामा क्वीन म्हणून राखी सावंत (Rakhi Sawant) ओळखली जाते. राखी नेहमीच तिच्या वेगवेगळ्या अतरंगी गोष्टींमुळे सतत प्रकाशझोतात येत असते. विचित्र वक्तव्य, हटके फॅशन सेन्स आणि सोशल मीडियावरील तिच्या नेहमीच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे राखीला मोठया प्रमाणावर लाईमलाइट मिळते. मात्र मागील काही काळापासून राखी तिच्या खासगी आणि वैवाहिक गोष्टींमुळे चर्चेत आली आहे.

राखीने बिग बॉस १५ च्या घरात तिच्या नवऱ्याची संपूर्ण जगाला ओळख करून दिली. मात्र तिचे हे लग्न जास्त काळ चालले नाही आणि व्हॅलेंटाइन डे च्या आधीच त्यांचे लग्न तुटले. हे लग्न तुटल्यानंतर राखीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही भावनिक पोस्ट देखील शेअर केल्या होत्या. मात्र आता राखी या सर्वातून बाहेर येत असून, सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये ती स्वतःला युगांडाची प्रिन्सेस असल्याचे सांगत आहे.

राखी सावंत प्रसिद्धी मिळवण्याची एकही संधी सोडत नाही. या ना त्या कारणामुळे ती किंवा कारण काढूनही ती प्रकाशझोतात येत असते. यातच राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ती एका खासगी चॉपरमधून उतरताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने दावा केला आहे की, तिने हे चॉपर खरेदी केले आहे. या व्हिडिओमध्ये राखीचे बदललेले अंदाज देखील लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये राखीने एखाद्या क्वीन प्रमाणे दणक्यात एन्ट्री मारली. तिचा लूक देखील एखाद्या राजकुमारी सारखा असून, चॉपरच्या सवारी दरम्यान राखी सावंतने स्वतःला युगांडाची प्रिन्सेस असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्यावर मजा देखील घेतली आहे.

नुकताच राखी सावंतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एका व्हिडिओमधून संदेश दिला होता. या व्हिडिओमधून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. युक्रेन आणि रुस यांच्यात सुरु असणाऱ्या युद्धादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना पुन्हा स्वदेशी आणत असल्यामुळे तिने हा या व्हिडिओमधून मोदीजींचे आभार मानले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा