Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड रणवीर सिंगच्या ‘या’ सवयीचा दीपिका पदुकोणला आलाय वैताग, मुलाखतीत अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

रणवीर सिंगच्या ‘या’ सवयीचा दीपिका पदुकोणला आलाय वैताग, मुलाखतीत अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जाते. दोघे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. सध्या दीपिका तिच्या ‘गहराइया’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने सांगितले की, तिला तिचा पती रणवीरची कोणती सवय अजिबात आवडत नाही. मुलाखतीदरम्यान दीपिकाने प्रश्नांची उत्तरे देताना सांगितले की, रणवीर असे काही करत नाही ज्यामुळे मी नाराज होईल.

दीपिका (Deepika Padukone) म्हणाली की, होय, “तो त्याचे जेवण लवकर संपवतो. ते पाहून माझी चिडचिड होऊ लागते.” याविषयी पुढे बोलताना दीपिकाने सांगितले की, ती डिनर करताना फक्त दोन घास खाते तोपर्यंत रणवीर (Ranveer Singh) त्याचे जेवण पूर्ण करतो आणि प्लेटही पाठवतो. यामुळे दीपिकाला खूप चिडचिड होते. पण या सगळ्या व्यतिरिक्त रणवीर असे काही करत नाही ज्यामुळे दीपिकाला काही त्रास होईल किंवा तिची चिडचिड होईल. याच मुलाखतीत दीपिकाने सांगितले की, तिचे पती रणवीरवर तिचे वेड्यासारखे प्रेम आहे. कारण रणवीर हा अतिशय संवेदनशील आणि काळजी घेणारा व्यक्ती आहे.

बॉलिवूडच्या पॉवर कपलपैकी एक असलेले दीपिका आणि रणवीर सध्या आपापल्या कामात व्यस्त आहेत. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या रणवीर-दीपिकाची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. ‘राम लीला’ या चित्रपटानंतरच दीपिका आणि रणवीर एकमेकांच्या जवळ आले. पण सत्य हे आहे की, चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नाआधी रणवीर आणि दीपिकाने एकमेकांना 6 वर्षे डेट केले होते. जोडीने ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ आणि ‘पद्मावत’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. लग्नानंतर ही जोडी पहिल्यांदा ‘83′ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचवेळी, दीपिकाचा ‘गहराइया’ देखील ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. दीपिकाशिवाय या चित्रपटात अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.(gehraiyaan deepika padukone husband ranveer singh movie ananya panday siddhant chaturvedi)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
दीपिका पदुकोणच्या 16 व्या वाढदिवसाला आईवडिलांकडून मिळालेले ‘ते’ गिफ्ट तिच्यासाठी आजही आहे अमूल्य

Gehraiyaan | दीपिका पदुकोणला किस करण्यासाठी सिद्धांत चतुर्वेदीने घेतली होती रणवीर सिंगची परवानगी?

हे देखील वाचा