Thursday, June 26, 2025
Home बॉलीवूड ‘गेहराइया’ सिनेमा संबंधित धर्मा प्रोडक्शनकडून झाली ‘ही’ मोठी चूक, सोशल मीडियावर आला मिम्सचा पूर

‘गेहराइया’ सिनेमा संबंधित धर्मा प्रोडक्शनकडून झाली ‘ही’ मोठी चूक, सोशल मीडियावर आला मिम्सचा पूर

सोशल मीडिया ‘ही’ आजच्या काळातील मनुष्याची चौथी जीवनावश्यक गरज बनली आहे. सोशल मेडियाशिवाय कोणीही राहू शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर या आभासी जगाने आपल्याला वेधले आहेत. सोशल मीडियावर अनेकदा बॉलिवूडमधील चित्रपटांबद्दल नेटकरी, युझर्स त्यांची मत मदत व्यक्त होताना दिसतात. सिनेमा आवडल्याच्या किंवा न आवडल्याच्या असंख्य प्रतिक्रिया सोशल मीडियावर येतात. मात्र यामध्ये मिम्स हा एक प्रकार आहे. ज्यात वेगवेगळ्या गोष्टींवर मार्मिक रूपाने विनोद केला जातो.

नुकताच दीपिकाचा ‘गहराइयां’ सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता दिसून आली. सिनेमातील गाणी, बोल्ड सीन्स आदी अनेक कारणामुळे हा सिनेमा चर्चेचा विषय होता. मात्र सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. सिनेमांबाबत लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. लोकांना हा सिनेमा अजिबात आवडला नाही. त्यानंतर या सिनेमाबाबत सोशल मीडियावर मिम्सचा पूर आला. अनेकांनी सिनेमावर मिम्स बनवत चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. हे मिम्स तुफान व्हायरल होत असताना, धर्मा प्रॉडक्शनने त्यांच्या सोशल मीडियावरून देखील या चित्रपटाशी संबंधित अनेक मिम्स शेअर केले आहेत.

हे ही बघा: बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमांच्या स्टोरी आहेत ढापलेल्या

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. नुकतीच धर्माकडून एक मोठी चूक झाली होती. धर्मा प्रॉडक्शनच्या सोशल मीडिया टीमने चुकून या सिनेमाचा एक नकारात्मक रिव्ह्यू पोस्ट केला. या पोस्टमध्ये लिहिले होते की, “एकच गहराइयां, गहराइयां पाहून माझ्या डोक्यात चालू आहे की, का मी हा सिनेमा पहिला. सिनेमा पाहून माझे डोके खराब झाले आहे.”

धर्मा प्रॉडक्शनच्या सोशल मीडिया टीमने ही चूक सुधारत पोस्ट झालेले मिम डिलीट केले आहे. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या पोस्टचे स्क्रिनशॉट नेटकऱ्यांनी वाऱ्यासारखे व्हायरल केले, आणि इंस्टाग्राम इतर अनेक सोशल मीडिया प्लँटफॉर्मवरून शेअर केले गेले. आता या चौकीवर देखील मोठ्या प्रमाणावर मिम्स व्हायरल होत आहे. नुकतेच कंगना रानौतने देखील करण जोहरच्या या ‘गहराइयां’ सिनेमावर मजाक करताना म्हटले की, “हा सिनेमा अश्लीलतेला बढावा देत आहे.” दीपिकाचा याआधी ‘छपाक’ सिनेमा प्रदर्शित झाला होता जो फ्लॉप ठरला. ‘गहराइयां’ सिनेमात दीपिकासोबतच सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आदी कलाकार मुख्य भूमिकेत असून शकुन बत्राने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा