Monday, February 26, 2024

जिनिलियाच्या तोंडून सर्वांसमोर ‘तो’ गोड शब्द ऐकून लाजेने लाल झाला रितेश देशमुख, व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूडचं नाही तर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या जोडीकडे पाहिले जाते. अतिशय गोड आणि क्युट कपल म्हणून त्यांची ओळख आहे. ते दोघं नेहमीच त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून कपल गोल्स देत असतात. रितेश आणि जिनिलिया बॉलिवूडमध्ये खूपच यशस्वी आहेत. मात्र रितेशने मराठीमध्ये देखील काम करत अनेक चांगले सिनेमे केले. रितेशने मागच्यावर्षी दिग्दर्शनात देखील उडी मारली आणि ‘वेड’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले.

त्याचा ‘वेड’ हा सिनेमा नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले आणि ऑल टाइम ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत वरचे स्थान मिळवले. याच सिनेमाच्या निमित्ताने जिनिलिया देशमुखने मराठी सिनेसृष्टीमधे पदार्पण केले. साऊथ आणि बॉलिवूड गाजवल्यानंतर जिनिलियाने मराठीमध्ये केलेले पदार्पण यशस्वी ठरले आणि संपूर्ण महाराष्ट्राने तिला आनंदाने स्वीकारले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

याच सिनेमासाठी जिनिलियाला एक पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान जिनिलिया जेव्हा स्टेजवर तिचा पुरस्कार स्वीकारायला गेली त्यानंतर जे घडले ते रितेशसोबतच सर्वांसाठी अनपेक्षित होते. हा पुरस्कार जिंकल्यानंतर तिने चक्क सर्वांशी मराठीत संवाद साधला आणि यावेळी तिने रितेशला चक्क ‘अहो’ अशी हाक देखील मारली. जिनिलीयाने प्रेमाने मारलेली ही हाक ऐकून रितेशही लाजला.

सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, यात जिनिलिया म्हणते “अहो, तुम्ही मला श्रावणी दिली. मी तुम्हाला हे अवॉर्ड दिलं. लव्ह यू”. त्यानंतर रितेश मंचावर जाऊन जिनिलीयाला नमस्कार करतो हे पाहून जिनिलिया देखील त्याला नमस्कार करते. सध्या त्यांचा हा व्हिडिओ खूपच गाजत असून प्रत्येक जणं त्यावर कमेंट्स करत त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तामिळ सुपरस्टार अजित कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

पारंपरिक वेशभूषेत कीर्तीने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा