Saturday, June 29, 2024

बर्थडे गर्ल जिनिलिया झाली जिमबाहेर स्पॉट; पॅपराजींना पाहून अभिनेत्रीने दिल्या ‘हटके’ पोझ

बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जिनिलिया आपल्या निखळ हास्याने आणि मोहक अदांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालते. तिचे इंस्टाग्रामवर तब्बल ५७ लाखांहून अधिक चाहते आहेत. ती सोशल मीडियावर सतत चाहत्यांसाठी नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जिनिलिया गुरुवारी (५ ऑगस्ट) आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी ती जिमबाहेर स्पॉट झाली. यादरम्यानचे तिचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

जिनिलिया जिमच्या समोर आपल्या कारमधून बाहेर येत असते, तेव्हा मीडिया फोटोग्राफर्सना पाहून प्रचंड आनंद होतो. त्यामुळे फोटोग्राफर दिसताच जिनिलियानेही हटके पोझ दिल्या. यावेळी ती काळ्या रंगाच्या शर्ट आणि लाल रंगाच्या पँटमध्ये दिसली.

जिनिलिया तिच्या आरोग्याकडे खूप लक्ष देताना आपल्याला नेहमी पाहायला मिळत असते. ती तिच्या दोन्ही मुलांच्या जन्मानंतरही स्वत: ला कायम फिट ठेवण्याचं प्रयत्न करत असते.

दरम्यान, बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपलपैकी एक कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख या जोडीला आपण कसे विसरू शकतो? या दोघांच्या लग्नाला बरीच वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आजही या दोघांमधील प्रेमाचे बंध अतूट आहेत. हे दोघेही त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्याच्या अनमोल प्रेमाची साक्ष देत असतात.

याव्यतिरिक्त त्यांच्या भेटीबद्दल बोलायचंं झालं, तर रितेश ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या टेस्ट शूटसाठी हैदराबादला गेला होता. तिथेच जिनिलिया आणि रितेशची भेट झाली. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, जिनिलियाला वाटले  होते की, इतर राजकारण्यांच्या मुलांसारखा रितेशही असेल. म्हणूनच दोघांनी बराच काळ एकमेकांकडे दुर्लक्ष केले. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर रितेश मुंबईला परतला.

मुंबईत आल्यावर रितेश आणि जिनिलियाला एकमेकांवरचे प्रेम समजायला थोडा वेळ लागला. हळूहळू त्यांचे प्रेम वाढत गेले आणि ते एकमेकांचे जीवलग मित्र बनले. रितेश देशमुख आणि जिनिलिया यांचे ९ वर्षांपासून गुप्त प्रेम प्रकरण होते. ३ फेब्रुवारी, २०१२ रोजी जिनिलिया आणि रितेश विवाहबंधनात अडकले. त्यांचा विवाह हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने झाला. रितेश आणि जिनिलिया आता दोन मुलांचे पालक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’

-तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

हे देखील वाचा