Sunday, October 19, 2025
Home बॉलीवूड ‘या’ अभिनेत्रिला M. S. Dhoni ने लव्ह गुरु बनत दिला होता मोलाच सल्ला

‘या’ अभिनेत्रिला M. S. Dhoni ने लव्ह गुरु बनत दिला होता मोलाच सल्ला

एमएस धोनी फक्त चालाख आणि महान कर्णधार आणि विकेटकीपरच नाही, तर तो एक जबरदस्त लव्ह गुरु सुद्धा आहे. याचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे. धोनीने केवळ आपल्या सहकारी खेळाडूंनाच नव्हे तर त्याच्या चाहत्यांनादेखील रिलेशनशिपबद्दल सल्ले दिले आहेत. नुकतचं बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने धोनीसोबतचा अनुभव शेअर केला आहे. यामध्ये तिनं अनेक खुलासे केले आहेत.

तर या अभिनेत्रिचं नाव अनुष्का सेन (Anushka sen) असं आहे. अनुष्का सेन लहानपणापासूनच इंडस्ट्रीत काम करत आहे. नुकतचं तिने एका पॉडकास्टमध्ये धोनीसोबतचा अनुभव शेअर केला. धोनी आणि अनुष्काची भेट एका लोकप्रिय जाहिरातीच्या शुटदरम्यान झाली.

यासंदर्भात तिला प्रश्न विचारले असता अनुष्का म्हणाली, प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, मला अजुनही धोनीसोबतची भेट स्वप्नासारखी वाटते. त्याच्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो सर्वांशी समान आदराने वागतो. तुम्ही कॅमेऱ्यामागील व्यक्ती आहात किंवा तुम्ही अभिनेता आहात याने काही त्याला फरक पडत नाही.

तसेच ती पुढे म्हणाली, मला सेटवरचा पहिला दिवस आजही आठवतो. असिस्टंट डायरेक्टर म्हणाले होते की, तुला माहीला भेटायचे आहे का? मी लगेच हो बोलले, कारण मला देखील हेच हवे होते. तो माझा आवडता क्रिकेटर आणि आवडता व्यक्ती आहे. मग मी माहीला जाऊन भेटले. तेव्हा माही म्हणाला, “तू कुठली आहेस? मी रांचीचा आहे. तू पण रांचीची आहेस ना?” माहीच्या या शब्दांनी मला आपलंसं केले.

२१ वर्षीय अनुष्का म्हणाली, मी आणि धोनी दोघेही वर्षातून एकदा तरी भेटतो. तेव्हा अनेक गोष्टींवर चर्चा होते. अनेक गोष्टी माझ्याशी तो शेअर करतो. माही मला माझ्या जीवनातील समस्यांवर मार्गदर्शन करतो. यावेळी माहीने मला सावधगिरीने डेट करण्यास सांगितले होते, त्याने मला काही टिप्सही दिल्या होत्या, असा खुलासा अनुष्का सेनने केला.

अभिनेत्रिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्काने २००९ मध्ये ‘यहां मै घर घर खेली’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. मात्र ‘बालवीर’ या मालिकेतील मेहेर या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. २०१२ पासून २०१६ पर्यंत तिने ही भूमिका साकारली होती. २०१९ मध्ये तिने ‘झांसी की रानी’ या मालिकेत राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली होती.

या मालिकेतील तिच्या अभिनयकौशल्याचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं होतं. अनुष्का बऱ्याच म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली आहे. शेखर रविजियानीच्या ‘इज दिस दॅट फिलिंग’, जुबिन नौटियालच्या ‘मस्त नजरों से’, असीस कौरच्या ‘गल करके’ आणि साचेत परंपरा यांच्या ‘चुरा लिया’ या म्युझिक व्हिडीओमध्ये अनुष्काने काम केलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

दुःखद! ‘अनुपमा’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण
‘बेबी मला तुझी खूप आठवण येते’, म्हणत सुकेशने व्हॅलेंटाईन डेला जॅकलिनसाठी लिहिले खास पत्र

हे देखील वाचा