पॅन-इंडिया स्टार राम चरण (Ramcharan) आज आपला ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. रामने ‘पेड्डी’च्या सेटवर केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. त्याचा एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.
विकी कौशलचे वडील आणि स्टंट दिग्दर्शक, शाम कौशल यांनी आज त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर राम चरणचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राम ‘पेड्डी’च्या संपूर्ण टीमसोबत केक कापताना दिसत आहे. शाम यांनी व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, “आज हैदराबादमध्ये ‘पेड्डी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सर्वांनी राम चरणचा वाढदिवस साजरा केला.” त्यांनी पुढे लिहिले, “देव रामला सर्व सुख आणि यश देवो.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










