Saturday, June 29, 2024

दुख:द! हॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री बेट्टी व्हाईट यांचे निधन, वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

हॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री बेट्टी व्हाईट (Betty White) यांचे निधन झाले आहे. त्या ९९ वर्षांच्या होत्या. गेली ६० वर्षे त्यांनी टीव्हीलाच मुख्य आधार बनवले. बेट्टी व्हाईट यांनी ‘द गोल्डन गर्ल्स’ आणि ‘द मेरी टायलर मूर शो’ मधून त्यांच्या टेलिव्हिजन करिअरची सुरुवात केली. टीव्हीच्या इतिहासात त्या सर्वाधिक काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांच्या निधनानंतर हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.

वाढदिवसाच्या १८ दिवस आधी घेतला जगाचा निरोप
बेट्टी व्हाईट (Betty White) यांनी ‘द गोल्डन गर्ल्स’ आणि ‘द मेरी टायलर मूर शो’ मधून त्यांच्या टेलिव्हिजन करिअरची सुरुवात केली. बेट्टी यांची गणना अशा हॉलिवूड अभिनेत्रींमध्ये केली जाते. ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपला ठसा उमटवला आणि सिनेमाला एक नवीन रूप दिले. वाढदिवसाच्या अवघ्या १८ दिवस आधी त्यांचा मृत्यू झाला. बेटी १७ जानेवारीला १०० वर्षांची झाली असेल.

८०च्या दशकात टेलिव्हिजन शोद्वारे प्रभावित
माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्रीने शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. बेट्टी यांनी ८० च्या दशकात टेलिव्हिजन शोमध्ये त्यांच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. १९३९ मध्ये बेट्टी यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यादरम्यान त्यांनी लोकप्रिय टीव्ही शो ‘द गोल्डन गर्ल’मध्ये रोझ नायलँडची भूमिका साकारून खूप प्रसिद्धी मिळवली. ही मालिका १९८५ ते १९९२ पर्यंत चालली. बेट्टी यांच्या नावावर एक मनोरंजक रेकॉर्ड देखील आहे. त्यांच्या नावावर अभिनयाचे ११५ क्रेडिट्स देखील आहेत आणि त्या ‘द बोल्ड अँड द ब्युटीफुल’, ‘लेडीज मी’, ‘दॅट ७० शो’, ‘बोस्टन लीगल’, ‘हॉट इन क्लीव्हलँड’ यासारख्या अनेक शोचा भाग होत्या.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला शोक व्यक्त
त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांचे वर्णन अतिशय छान महिला असे केले आहे. त्यांनी ट्वीट केले की, “मला आणि जिलला (अमेरिकेची फर्स्ट लेडी) बेटी व्हाईट यांची खूप आठवण येईल, बेटी यांनी त्यांच्या लहानपणापासूनच अमेरिकन नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम केले आहे.”

अनेक पुरस्कारांनी करण्यात आले आहे सन्मानित
बेट्टी व्हाईट यांना प्राइमटाईम एम्मी पुरस्कार, अमेरिकन कॉमेडी पुरस्कार, स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार आणि ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या शानदार कारकिर्दीबद्दल आणि हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना लाइफ टाईम अचिव्हमेंट ॲवॉर्डही देण्यात आला आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा