Friday, November 22, 2024
Home साऊथ सिनेमा ज्युनिअर एनटीआर इंग्रजीमुळे होतोय ट्रोल! गुलशन देवैया पाठिंबा देत म्हणाला, ‘हे भारतीय चित्रपटांसाठी…’

ज्युनिअर एनटीआर इंग्रजीमुळे होतोय ट्रोल! गुलशन देवैया पाठिंबा देत म्हणाला, ‘हे भारतीय चित्रपटांसाठी…’

नुकंतच यावर्षीचा 80 वा ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023′ अमेरिका कॅलिफोर्नियामधील बेवली हिल्स हिल्टनमधील हा सोहळा थाटामाटात पार पडला. यामध्ये एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटामधील नाटु नाटु गाण्याने बेस्ट ओरिजनल सॉंगचा खिताब आपल्या नावावर केला आहे. अशातच रेड कार्पेटवर अभिनेता ज्युनिअर एनटी आर याने आरआरआर आणि नाटु नाटु गाण्ययाबद्दल बोलत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफाव व्हायरल होत आहे. मात्र, यामध्ये अभिनेत्याला अमेरिकन इंग्रजी भाषेमध्ये मत व्यक्त  केलं आहे ज्यामुळे अभिनेत्याला मोठ्या प्रमानात ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे अभिनेता गुलशन देवैया याने एनटीआरला पाठिंबा देत सोसशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

प्रसिद्द अभिनेता गुलशन देवैय्या (Gulshan Devaiah) याने पोस्ट शेअर करत लिहिले की, “प्रथम मला वाटते की NTR चा उच्चार तितका वाईट नाही जेवढं लोक ते बनवत आहेत, दुसरं म्हणजे ही एक विचारपूर्वक केलेलं PR धोरण आहे. सहज घ्या..त्याला पंख पसरवून उडण्याचा प्रयत्न करू द्या. हॉलिवूडची जागतिक बाजारपेठ मोडीत काढल्यास भारतीय चित्रपटांसाठी ते चांगलं आहे. त्याचा फायदा आपल्या सर्वांनाच होईल.”

गुलशनने एनटीआरला पाठिंबा दिल्यानंतर पत्रकारांनाही उत्तर दिलं आहे. पोस्ट शेअर करत पत्रकारांना बोलला की, , “मला वाटतंय जर ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR) अमेरिकेत राहत असता तर तो आता बोलतोय तसंच बोलला असता कारण तो फर्स्ट जनरल इमिग्रंट्स म्हणून बोलतोय. आपल्या सगळ्यांचे नातेवाईक आहेत त्याहून वाईट उच्चार असलेले असे लोक आहेत जे अनेक दशकांपासून अमेरिकेत राहतात आणि तरीही वाटते की आम्ही उच्चारांचे तज्ञ आहोत.”

गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये रेड कार्पेटवर आरआरआर (RRR) आणि नाटु नाटु (Natu Natu) गाण्याबद्दल बोलत असताना एनटीआरने एका अमेरिकन पत्रकाराशी संवाद साधला होता त्यावेळी अभिनेता म्हणाला की, “राजामौलीचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेत, आम्हाला वाटले की, आमच्याकडे एक वजेता आहे, पण जपान पेक्षा हे विजेता जास्त आहे आणि आज अमेरिका, चला. आपण हे घडण्याची अपेक्षा करू नका.”

नाटु नाटु गाण्याने ओरिजनल सॉंगसाठी ग्लोबल अवॉर्ड जिंकला आहे. या गाण्याचे दिग्दर्शक एमएम कीरावनी (M. M. Keeravani) यांनी कंपोज केलं असून आणि राहुल सिप्लिगुंज यांनी लिहिलं आहे. नाटु नाटु हे गाणं राम चरण (Ram Caharn) आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यावर चित्रित केलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हॅप्पी बर्थडे ! एका यूट्यूब व्हिडिओने नशीब पालटले आणि मिथिला पालकर अभिनयात आली
लग्नाच्या बऱ्याच वर्षांनी जुही चावलाने घेतला सुवासिनीचा ‘हा’ दागिना घालण्याचा निर्णय

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा