Thursday, November 30, 2023

रजनीकांत ते राम चरण, ‘या’ सुपरस्टार्सच्या सिनेमांसाठी आहात ना तयार? २०२३मधील उन्हाळ्यात करणार धुमाकूळ

सध्या बॉलिवूडपेक्षाही जास्त लक्ष कोणत्या सिनेमांकडे लागले असेल, तर ते म्हणजे दाक्षिणात्य सिनेमांकडे. दाक्षिणात्य सिनेमातील भव्यदिव्यता आणि त्यातील कथा या प्रेक्षकांना त्यांच्याकडे आकर्षित करत आहेत. आगामी काळात दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर, राम चरण यांच्यापासून ते प्रभासपर्यंत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील जबरदस्त कलाकारांचे सिनेमे येऊ घातले आहेत. या सर्व सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ५ दिग्गज कलाकार सन २०२३पर्यंत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येच आपले सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहेत. त्यामुळे या सिनेमांबाबत चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे. चला तर कोणते आहेत ते सिनेमे जाणून घेऊया…

हे आहेत ते ५ सिनेमे
आरसी १५
माध्यमांतील वृत्तानुसार, जगभरात ११४० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या ‘आरआरआर’ (RRR) सिनेमातील मुख्य अभिनेता राम चरण (Ram Charan) नवीन सिनेमा घेऊन येतोय. सध्या तो शंकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘आरसी १५’ (RC 15) या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा आडवाणी ही अभिनेत्रीदेखील आहे. निर्माते हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच २०२३च्या उन्हाळ्यापर्यंत रुपेरी पडद्यावर घेऊन येण्याची योजना आखत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

एसएसएबी २८
या यादीत महेश बाबू (Mahesh Babu) याच्याही सिनेमाचा समावेश आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला ‘एसएसएबी २८’ सिनेमा पुढील वर्षी उन्हाळ्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात महेश बाबूसोबत अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) देखील दिसणार आहे.

एनटीआर ३०
दिग्दर्शक कोरताला शिवा आणि ‘आरआरआर’ (RRR) फेम ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) ही जोडी पॅन इंडिया सिनेमा घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. ‘एनटीआर ३०’ (NTR 30) असे त्याच्या सिनेमाचे नाव आहे. हा सिनेमाही पुढील वर्षी उन्हाळी हंगामापर्यंत प्रदर्शित होऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

सालार
‘केजीएफ’सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे दिग्दर्शक प्रशांत नील (Prashant Neel) हे आगामी सिनेमा घेऊन येत आहेत. प्रशांत हे आता ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास (Prabhas) याच्यासोबत सन २०२३च्या उन्हाळी हंगामात ‘सालार’ हा सिनेमा प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. या सिनेमात अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Haasan) प्रभाससोबत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

रजनीकांत यांचा १६९वा सिनेमा
विशेष म्हणजे, या यादीत कॉलिवूड सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या ‘थलायवा १६९’ (Thalaiva 169) हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा २०२३च्या उन्हाळी हंगामात रुपेरी पडद्यावर झळकेल. या सिनेमाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार करत आहेत.

आता हे सिनेमे रुपेरी पडद्यावर आल्यानंतर काय कमाल दाखवतात, हे तेव्हाच कळेल. तोपर्यंत चाहत्यांची उत्सुकता गगनाला भिडल्याचे दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

लंडनमध्येही जपलाय मराठी बाणा, दिग्दर्शक प्रविण तरडेंच्या व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

‘मृत्यू आणि देवाला एकत्रच पाहिले’, अपघातानंतर सुपरहिट ‘बारिश की जाये’ फेम गीतकाराची पोस्ट व्हायरल

स्ट्रगलर ते स्टार: वडिलांच घड्याळ विकून ५० रुपये घेऊन मुंबई गाठलेला मुलगा ‘असा’ बनला बॉलिवूडचा सुपरस्टार

हे देखील वाचा