Saturday, April 19, 2025
Home साऊथ सिनेमा आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक आनंदाची बातमी येत आहे. अभिनेत्री नयनताराने एका टीव्ही शोमध्ये आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. तिने हेही सांगितले आहे की, तिने साखरपुडाही केला आहे. विजय टेलीव्हिजनच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये नयनतारा दिसत आहे.

नयनतारा या टॉक शोमध्ये आपल्या साखरपुड्याबाबत बोलताना दिसत आहे. व्हिडिओत ती सांगते की, तिने जी अंगठी परिधान केली आहे, ती साखरपुड्याची अंगठी आहे.

कोण आहे तो नशीबवान?
नयनताराने आपला बॉयफ्रेंड आणि दिग्दर्शक- निर्माता विग्नेश शिवनसोबतचे आपले नाते अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. नयनतारा सन २०१५ मध्ये तमिळ चित्रपट नानुम राऊडी धानमध्ये काम करताना विग्नेशच्या प्रेमात पडली होती. (Good News Actress Nayanthara Confirmed Her Engagement Know Who Is Actress Lucky Life Partner)

नयनताराचा साखरपुडा
नयनताराने निर्माता विग्नेश शिवनसोबत आपला साखरपुडा एकदम अधिकृतरीत्या जाहीर केला आहे. यापूर्वीही सोशल मीडियावर विग्नेशच्या पोस्टने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते की, तो खरंच नयनताराशी साखरपुडा करणार आहे का? काही काळापूर्वी विग्नेशने फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये नयनताराला अंगठी देताना दिसत होता. तरीही, या फोटोत कोणाचाही चेहरा दिसला नव्हता.

दुसरीकडे विग्नेशच्या काथुवाकुला रेंदु काधल’ या आगामी चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात नयनताराही दिसणार आहे. तसं पाहिलं, तर चित्रपटात समंथा अक्किनेनी आणि विजय सेतुपतीही महत्त्वाच्या भूमिकेत असतील. हा आगामी तमिळ चित्रपट एक ट्रँगल रोमँटिक चित्रपट आहे.

दुसरीकडे डायना मरियम कुरियनला खरं तर नयनतारा म्हणून ओळखले जाते. ती एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे, जी तमिळ आणि तेलुगु चित्रपटात काम करताना दिसते. ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रमुख अभिनेत्रींपैकी एक आहे.

नयनताराचे चित्रपट

नयनताराने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. त्यामध्ये ‘दरबार’, ‘चंद्रमुखी’, ‘बॉस’, ‘बिल्ला’, ‘शिवाजी’, ‘डोरा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा