करीना कपूर खानने प्रेग्नेंसी दरम्यानच्या ‘सेक्स लाईफ’बद्दल केला खुलासा; म्हणाली, ‘त्यावेळी सैफ खूप…’

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही मागील अनेक दिवसांपासून खूप चर्चेत आहे. अलिकडेच तिचे ‘करीना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे. तिने सोमवारी (९ ऑगस्ट) तिचे हे पुस्तक लॉन्च केले आहे. करीनाने तिचा मित्र करण जोहर याच्यासोबत इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन हे पुस्तक लॉन्च केले आहे. यावेळी करणने तिला प्रेग्नेंसी दरम्यानचे अनेक प्रश्न विचारले, ज्या प्रश्नांची उत्तरं बेबोने दिली. तिने तिच्या प्रेग्नेंसी दरम्यानच्या आयुष्यात आलेले चढ-उतार यावर चर्चा केली.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये करीनाने सांगितले की, पहिल्या प्रेग्नेंसीपेक्षा दुसरी प्रेग्नेंसी खूप कठीण होती. करीनाने संगितले की, “माझी दुसरी प्रेग्नेंसी माझ्यासाठी खूप कठीण होती. जेवढा त्रास मला जेहच्या वेळेस झाला तेवढा त्रास तैमूरच्या वेळेस झाला नव्हता. तैमूरच्या वेळेस सगळं नॉर्मल होते. मी तो काळ एन्जॉय केला होता. यातूनच मला प्रेरणा मिळाली की, दुसऱ्यांदाा ट्राय करायला काही हरकत नाही. परंतु दुसऱ्या वेळेस सगळं काही बदललं होतं. मला खूप त्रास झाला. यामुळे मी असा विचार करत होते की, मी हे करू शकणार नाही. मला असे वाटतं होते की, आता हे ठीक होऊ शकत नाही.” (kareena kapoor khan tell how was her sex life during pregnency in her book )

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करीनाने पूढे सांगितले की, “जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असता, तेव्हा लोकांना या गोष्टीची जाणीव नसते की, तुम्हाला नक्की काय वाटत असते. कधी कधी मी आनंदी, मजेत आणि सेक्सी फील करायची. पण मला असे वाटायचे हे काय होतं आहे. मी हे कसं करू शकते, मला काहीच समजत नव्हते. मी शेवटच्या काही दिवसात मानसिक दृष्ट्या खचून गेले होते. मला असे वाटत होते की, माझे पाय १०० किलोचे झाले आहेत.”

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करीना कपूरने या दरम्यान सेक्स लाईफबद्दल देखील सांगितले. तिने सांगितले की, “अशा वेळी पुरुषाचे सोबत असणे खूप गरजेचे असते. जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असता तेव्हा लोकांना असे वाटते की, तुम्हाला सेक्सबाबत काही भावना नसतात. पण वास्तवात तुम्ही या सगळ्या गोष्टी फील करत असतात. त्यावेळी तुमचा पती तुमच्यासोबत असणे खूप गरजेचे असते. यावेळी मला सैफने मला खूप मदत केली.”

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करीनाने या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. पण तिने अजूनही तिच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाही. तिने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जेह असे ठेवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या

-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे

-बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये पसरली नाराजी; युजर्स म्हणतायेत, ‘टीआरपीसाठी…’

Latest Post