Saturday, June 29, 2024

रश्मिका आणि विजय मालदीवमध्ये एकत्रच? नेटकऱ्यांच्या हाती मोठा पुरावा

नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळवणारी रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna) सध्या तिच्या करिअरच्या शिखरावर आहे. रश्मिका नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. मालदीवमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. अलीकडेच पहिला फोटो शेअर केला आहे. माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार विजय देवरकोंडा(Vijay Deverkonda) रश्मिकाच्या काही वेळापूर्वीच मुंबई विमानतळावर पोहोचला होता. दोघेही एकमेकांना डेट करते अशी चर्चाे रंगली आहे.

रिपोर्ट्सनुसार हे दोघेही एकमेकांसोबत मालदीवमध्ये त्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दोघांनी ‘गीथा गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’ या तेलुगू चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघांना एकत्र पाहणे चाहत्यांना आवडते. रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि रिअल लाईफ जोडी चाहत्यांना खूप आवडते.

 

View this post on Instagram

 

रश्मिका तिच्या आणि विजयच्या नात्याबद्दल म्हणाली की, मी आणि विजयने करिअरच्या सुरुवातीला एकत्र काम केले आहे. जेव्हा तुम्हाला हे माहित नसते की इंडस्ट्री कशी चालते आणि अचानक तुम्हाला तुमच्या आवडत्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळते तेव्हा तुम्ही मित्र बनता. आम्हा दोघांचे अनेक कॉमन मित्र आहेत. माझी हैदराबादमध्ये एक गँग आहे, त्याचीही हैदराबादमध्ये स्वतःची गँग आहे आणि आमचे बरेच कॉमन मित्र आहेत. तिने पुढे सांगितले की, जेव्हा चाहत्यांना आम्हाला एकत्र पाहणे आवडते तेव्हा खूप आनंद होतो. करण जोहरच्या चॅट शोमध्ये विजय देवरकोंडा ही त्याच्या आणि रश्मिका मंदानाच्या बाँडबद्दल मोकळेपणाने बोलला होता.

रश्मिका आणि विजयने या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण
रश्मिका आणि विजय यांनी या वर्षात बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. विजयने अनन्या पांडेसोबत लिगर या चित्रपटातून पदार्पण केले. त्यावेळी रश्मिकाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनूमध्ये ही दिसणार आहे. याशिवाय ही अभिनेत्री रणबीर कपूरसोबत संदीप रेड्डी वंगा यांच्या अ‍ॅनिमल चित्रपटात दिसणार आहे. त्याचवेळी, विजय समंथा रुथ प्रभूच्या सोबत खुशी सिनेमात दिसणार आहे. हा चित्रपट 23 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तिने लक्ष दिलं नसतं तर मी आज जिवंत नसते’; दीपिकाने केला धक्कादायक खुलासा

पहिलं को-स्टारवर प्रेम, नंतर प्रसिद्ध मॉडेलवर फिदा झाला करण कुंद्रा; वाचा त्याच्या आयुष्यातील रोचक किस्से

हे देखील वाचा