Thursday, June 13, 2024

पहिलं को-स्टारवर प्रेम, नंतर प्रसिद्ध मॉडेलवर फिदा झाला करण कुंद्रा; वाचा त्याच्या आयुष्यातील रोचक किस्से

टेलिव्हिजनचा हँडसम हंक करण कुंद्रा याने‘बिग बॉस 15’मध्ये आपला ठसा उमटला आहे. करण कुंद्रा बुधवारी (11 ऑक्टोबर ) आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. बिग बॉस मधीम घरी गेल्यानंतर तो आणि तेजस्वी प्रकाश नेहमी स्पॉट केले जातात. यांच्या नात्याच्या अनेक चर्चा सुरु आहेत. यांच्या चाहत्यांना यांच्या लग्नाची आतुरता लागली आहे. करण वाढदिवसानिमित्ताने त्याच्या खास दिवशी काही माहिती जाणून घेऊया. 

 

करण कुंद्राचा जन्म  ऑक्टोबर 1984 रोजी जालंधर, पंजाब येथे झाला. करण त्याच्या घरात तीन बहिणींचा सर्वात लहान भाऊ आहे. त्याचे वडील एक मोठे व्यापारी आहेत. करणने राजस्थानच्या अजमेर येथील मेयो कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आणि अमेरिकेतून एमबीएची पदवी घेतली. करणला सुरुवातीच्या काळात अभिनय किंवा मॉडेलिंग करायचे नव्हते. अभिनेता हा व्यापारी कुटुंबातील होता, त्यामुळे अशा परिस्थितीत तो आपल्या व्यवसायाची काळजी घेणार होता. पण नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि करण कुंद्राने मुंबई गाठली. करणने आपल्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये ‘कितनी मोहब्बत है’ पासून केली होती. या मालिकेत करणने अर्जुन पुंजची भूमिका साकारली होती.

करण कुंद्राच्या या पात्राला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. या मालिकेत करण कुंद्रासोबत अभिनेत्री कृतिका कामरा मुख्य भूमिकेत होती. आरोही शर्माच्या भूमिकेत कृतिकालाही चांगलीच पसंती मिळाली. करण आणि कृती या मालिकेच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.

कितनी मोहब्बत है’ या शोने केली सुरुवात
यानंतर करण ‘बेताब दिल की तमन्ना है’ मध्ये दिसला. करणने त्याच्या टीव्ही कारकिर्दीत इतर अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे, ‘कितनी मोहब्बत है’ सीझन 2, ‘गुमराह: एंड ऑफ इनोसन्स’, ‘जरा नच के दिखा’, ‘तेरी मेरी लव स्टोरीज’, ‘एमटीव्ही लव्ह स्कूल2’ आणि3, ‘प्यार तुने क्या किया’, ‘दिल ही तो है’ इत्यादी शोमध्ये दिसला. करणच्या शोप्रमाणेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अफेअरचीही खूप चर्चा झाली.

अनुशा दांडेकरने केला फसवणुकीचा आरोप
कृतिका कामरापासून विभक्त झाल्यानंतर करण कुंद्राचे प्रसिद्ध मॉडेल आणि व्हीजे अनुषा दांडेकर यांच्यासोबत अफेअर होते. करण आणि अनुषाचे नाते बरेच दिवस टिकले होते. दोघांनीही त्यांचे नाते खुले ठेवले होते. मात्र, गेल्या वर्षी त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. करणपासून विभक्त झाल्यानंतर अनुषाने करण कुंद्रावर फसवणुकीचा आरोप केला आहे.

करण कुंद्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अभिनेत्याने केवळ मालिकांमध्येच प्रयत्न केला नाही, तर करण कुंद्रा चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही दिसला आहे. ‘कितनी मोहब्बत है’ नंतर करण कुंद्रा ‘बेताब दिल की तमन्ना है’, ‘ये कहां आ गया हम’, ‘दिल ही तो है’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सारख्या मालिकांमध्ये दिसला आहे. याशिवाय, त्याने ‘लव्ह स्कूल’ आणि ‘रोडीज’ सारख्या अनेक रियॅलिटी शोला परीक्षण केले आहे. त्याचबरोबर त्याने चित्रपटांमध्येही काम केले आहे. करण ‘1921’, ‘मुबारकान’, ‘हॉरर स्टोरी’ सारख्या चित्रपटांमध्येही दिसला आहे.

हेही वाचा-
चाहत्यांसाठी खुशखबर! शहनाज गिलला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, पोस्ट शेअर करत दिले हेल्थ अपडेट्स

दु:खद! ‘बाहूबली’फेम अभिनेत्याला पितृशोक! 95व्या वर्षी वडिलांनी घेतला जगाचा निरोप

हे देखील वाचा