Friday, January 30, 2026
Home कॅलेंडर दुःखद! प्रसिद्ध अभिनेते रे लिओटा यांचे निधन, झोपेतच घेतला अखेरचा श्वास

दुःखद! प्रसिद्ध अभिनेते रे लिओटा यांचे निधन, झोपेतच घेतला अखेरचा श्वास

अमेरिकन अभिनेते रे लिओटा (Ray Liotta) यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे. बातम्यांनुसार, ते डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यादरम्यान झोपेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांची सहकारी जेनिफर ऍलनने सांगितले की, लिओटा ‘डेंजरस वॉटर्स’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते.

लॉरेन ब्रॅको, जिने ‘गुडफेलास’मध्ये रिओटासोबत काम केले, तिने श्रद्धांजली वाहिली. तिने ट्विटरवर लिहिले की, ‘रे बद्दलची ही भयानक बातमी ऐकून मी पूर्णपणे स्तब्ध झाले आहे, मी जगात कुठेही गेले की, लोक माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की त्यांचा आवडता चित्रपट गुडफेलास आहे. मग ते नेहमी विचारतात की, तो चित्रपट बनवण्याचा सर्वोत्तम भाग कोणता होता. माझी प्रतिक्रिया नेहमी सारखीच असते… रे लिओटा.” (goodfellas actor ray liotta dies at 67)

रे लिओटा हे ‘गुडफेलास’ चित्रपटात मॉबस्टर हेन्री हिलच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. हे पात् खूप लोकप्रिय झाले होते. तसेच अभिनेता ‘फील्ड ऑफ ड्रीम्स’मध्ये देखील दिसले.

हे देखील वाचा