Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘गोपी बहू’ने केला ‘देवर जी’सोबतचा रोमँटिक व्हिडिओ शेअर; नेटकरी म्हणतायेत, ‘हे काय चाललंय?’

टेलिव्हिजन विश्वातील गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी आजकाल टीव्हीपासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते. आजकाल देवोलीना तिच्या फोटो आणि व्हिडिओद्वारे चाहत्यांमध्ये चर्चा रंगवत असते. अलीकडेच देवोलीनाने अभिनेता विशाल सिंगसोबत एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

देवोलीना भट्टाचार्जी आणि विशाल सिंग यांचा हा प्रेमाने भरलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. देवोलीना विशाल सिंगसोबत ‘साथ निभाना साथिया’ मध्ये दिसली होती. त्या मालिकेत विशाल सिंगने देवोलीना अर्थात गोपी बहूच्या दिराची भूमिका साकारली होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते देखील अभिनेत्रीची टिंगल करत आहेत. ‘गोपी बहू’ तिच्या दिरासोबत रोमान्स करत असल्याच्या या व्हिडिओला चाहते खूप मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

देवोलीनाने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या ऑनस्क्रीन ‘देवर जी’सोबत रोमान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये विशाल पायऱ्यांवर बसला आहे आणि बॅकग्राउंडमध्ये ‘रब मानेया’ हे गाण वाजत आहे. तितक्यात देवोलीना मागून येते आणि विशालला मिठी मारते. पण ती अचानक गायबही होते. या व्हिडिओ एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले की, “दीर आणि वहिनी एकत्र.”

यापूर्वी देवोलीना भट्टाचार्जीने पिवळ्या बिकिनीमध्ये तिचे फोटो शेअर करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. हे फोटो शेअर करताना देवोलीनाने कॅप्शनमध्ये लिहिते की, ‘तुम्ही कोणती चूक नाही. तुम्ही कोणती समस्या नाही. ज्याचं समाधान करावं लागेल. पण, तुम्ही तोपर्यंत शोधू नाही शकणार, जोपर्यंत तुम्ही तुमचं डोकं लाजेच्या पिंजऱ्यावर आणि भितीच्या भिंतीवर आपटण बंद करण्यास तयार होणार नाही.” या फोटोला देखील चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा