दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी नयनतारा(Nayanthara) आणि विघ्नेश शिवन(Vignesh Shivan) यांनी रविवारी चाहत्यांना सुखद धक्का दिला. या जोडप्याने जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे. नयनतारा आणि विग्नेश हे लग्नाच्या चार महिन्यांतच जुळ्या मुलांचे आई-वडील झाले आहे. या दोघांनी सरोगसीद्वारे जुळ्यांना जन्म दिल्याची चर्चा होती. मात्र आता नयनतारा-विघ्नेश वादात भऱ्यात अडकले आहेत. सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
नयनतारा आणि विघ्नेशने 9 जून रोजी लग्न केले. ‘नयन आणि मी, अम्मा आणि अप्पा झालो’, असं कॅप्शन देत विग्नेशने रविवारी सोशल मीडियावर जुळ्या मुलांचे फोटो पोस्ट केले होते. त्याचसोबत या मुलांची नावंसुद्धा त्याने जाहीर केली होती. या दोघांनी सरोगरीद्वारे जुळ्यांना जन्म दिल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तविला होता. गेल्या काही काळात बऱ्याच सेलिब्रिटींनी सरोगसीचा पर्याय निवडला. यामध्ये बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचाही समावेश होता.
View this post on Instagram
काही कायदेतज्ज्ञांनी ही बाब निदर्शनास आणून दिली की भारतात जानेवारीपासून काही अपवाद वगळता सरोगसी बेकायदेशीर ठरली आहे. यावर तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एमए सुब्रमण्यम यांना एका पत्रकार परिषदेत तमिळनाडूचे आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम यांना नयनताराच्या सरोगसीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. चार महिन्यांपूर्वी लग्न झालेले जोडपे सरोगसीद्वारे गर्भधारणा करू शकतात का आणि वेळेचे काही बंधन आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर देताना मंत्री म्हणाले, “यासंदर्भात वैद्यकीय सेवा संचालनालयाला चौकशी करण्याचे आणि नयनतारा आणि विघ्नेशकडून स्पष्टीकरण मागवण्याचे निर्देश दिले जातील.”
नयनतारा आणि विग्नेश यांनी अद्याप सरोगसीसंदर्भात कोणतंही भाष्य किंवा खुलासा केला नाही. 2015 मध्ये या दोघांची एका चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. काही वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी यावर्षी जून महिन्यात लग्न केले. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, ए. आर. रेहमान, मणीरत्नम, विजय सेतुपती, सुर्या, रजनीकांत हेसुद्धा लग्नाला उपस्थित होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शालिनला धक्का देणं पडलं महागात, बिग बॉसने दोन आठवड्यांसाठी दिली ‘ही’ शिक्षा
दुःखद! ‘छेलो शो’ फेम बालकलाकाराचं वयाच्या 10 व्या वर्षी कर्करोगाने निधन