Wednesday, July 3, 2024

बापरे! अभिनेता गोविंदाचा हैराण करणारा खुलासा; ‘या’ कारणामुळे दिला होता सलमान खानच्या चित्रपटात काम करण्यास नकार

बॉलिवूडचा नामांकित अभिनेता गोविंदाने ऐंशी आणि नव्वदचे दशक आपल्या अभिनयाने गाजवले आहे. एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारा गोविंदा, अभिनयासोबतच त्याच्या उत्तम डान्ससाठीही ओळखला जातो. त्याच वेळी, गोविंदा आणि अभिनेता सलमान खानने मोठ्या पडद्यावर एकत्र काम करून बरीच धमाल केली आहे. दोघेही खूप चांगले मित्र आहेत.

चाहत्यांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी असते, जेव्हा हे दोघे एकत्र स्क्रीन शेअर करतात. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, या जोडीने एकत्र काम करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांचे चाहते खूप आनंदित होतात. अशा परिस्थितीत गोविंदाने सलमानसोबत काम करण्याच्या बाबतीत एक खुलासा केला आहे.

सलमानसोबत कामाच्या बाबतीत खुलासा
माध्यमांतील वृत्तांनुसार, नुकताच गोविंदाने हा खुलासा केला आहे की, ‘पार्टनर’ चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सलमान त्याच्याकडे एका चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते. हा चित्रपट ‘शिक्षणाच्या आईचा घो’ मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गोविंदाला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नसल्यामुळे त्याने हा चित्रपट नाकारला.

अभिनेता म्हणाला की, “या चित्रपटाची कथा मला आवडली नाही. तसे तर मला माहित होते की, हा चित्रपट मराठीच्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक आहे. पण त्यावेळी मी या चित्रपटाशी सहमत नव्हतो.”

गोविंदा पुढे म्हणाले की, “यात काहीच शंका नाही की, मी कामाचा भुकेलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की, माझ्या मनाला न आवडलेले काम मी करेन. महेश खूप चांगला मित्र आहे, पण जेव्हा काहीतरी चांगले असेल आणि मला मनापासून ते आवडेल, तेव्हा मी नक्कीच त्यांच्यासोबत काम करेल. सलमानबद्दल बोलायचे झाले, तर तो आणि मी एकत्र विनोदी मसाला चित्रपटांसाठी चांगले आहोत, या प्रकारची कला अशा चित्रपटांसाठी नाही.”

अशी आहे चित्रपटाची कहाणी
‘शिक्षणाच्या आईचा घो’ हा एक मराठी सुपरहिट चित्रपट होता. ही एका वडिलांची कथा होती, जो आपल्या मुलाला अभ्यास करण्यासाठी जबरदस्ती भाग पाडायचा. मात्र, मुलाला क्रिकेटपटू बनायचे असते. या चित्रपटात सचिन खेडेकर, भरत जाधव, सक्षम कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव आणि स्वत: महेश मांजरेकर यांच्यासारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

-प्रसिद्ध गायिकेला करावा लागला होता लैंगिक शोषणाचा सामना, वयाच्या १९ व्या वर्षी होती गरोदर

-क्या बात है! मिथुन चक्रवर्ती यांचा ‘डिस्को डान्सर’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; दिवाळीच्या आसपास होणार रिलीझ

हे देखील वाचा