Sunday, May 19, 2024

‘या’ अभिनेत्रीसाठी ठरलेले लग्नही मोडायला तयार होता गोविंदा, वादानंतर बांधली सुनितासोबत लग्नगाठ

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत जे सध्या सिने जगतात काम करत नसले तरी त्यांच्या अभिनयाची आणि गाजलेल्या चित्रपटांची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. यामधीलच एक नाव म्हणजे अभिनेता गोविंदा (Govinda). आपल्या दमदार अभिनयासाठी आणि जबरदस्त डान्स शैलीसाठी गोविंदा सिने जगतात लोकप्रिय आहे.90च्या दशकात अनेक सुपरहीट चित्रपट देणाऱ्या गोविंदाचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सध्या आपल्या वैवाहिक जिवनात व्यस्त असलेल्या गोविंदाला प्रेम प्रकरणामुळे लग्नही मोडावे लागले होते. काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊ.

गोविंदा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असे नाव आहे, ज्याचे चाहते त्याच्याशी संबंधित प्रत्येक बातमीवर बारीक नजर ठेवून असतात. आपल्या दमदार अभिनयाने त्याने चित्रपट जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. 80-90च्या दशकात गोविंदाच्या चित्रपटांनी सर्वांनाच वेड लावले होते. याच काळात एका प्रेमप्रकरणामुळेही गोविंदा चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी गोविंदाचे सुनीतासोबत साखरपुडा झाला होता पण तरीही गोविंदा बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारीच्या प्रेमात पडला होता.

एका मीडिया मुलाखतीदरम्यान गोविंदाने सांगितले होते की, नीलम त्याला खूप आवडते आणि तिच्याशी लग्न करू इच्छितो. त्यामुळे त्याची सुनीतासोबतची एंगेजमेंटही रद्द झाली होती. गोविंदा आणि नीलम यांनी चित्रपटात एकत्र काम केल्यामुळे सुनीताला असुरक्षित वाटत होते. त्यामुळे वैतागून गोविंदाने लग्न मोडले. मात्र नंतर सुनीताने 5 दिवसांनी गोविंदाला बोलावून समजावले, त्यानंतर दोघांनी लग्न केले.

गोविंदा आणि नीलम कोठारी यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर या दोन्ही कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. या चित्रपटांमध्ये हत्या, खुदगर्ज, इलजाम आणि लव्ह 86 सारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. नीलमसोबतच्या नात्याबद्दल गोविंदाने अनेकवेळा उघडपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा-
गोविंदा का म्हणाला, ‘करण जोहर सर्वात ईर्ष्यावान व्यक्ती आहे’, कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य
ना कश्मिरा शहा, ना सुनीता, पण ‘हे’ आहे कृष्णा अभिषेक आणि गोविंदाच्या भांडण्याचे कारण, वाचा

हे देखील वाचा