अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याचा भाचा कृष्णा (Krushna ) यांच्यातील वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता या वादाबद्दल महत्वाची बातमी समोर आली असून गोविंदाने अखेर त्याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेकला माफ केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. गेल्या महिन्यात कृष्णाने मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये त्याचे मामा गोविंदाची जाहीर माफी मागितली होती. आता नुकतेच गोविंदाने सेम पॉडकास्टवर कृष्णाला माफ केले आहे.काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
आपल्या भाच्यासोबतचा अनेक दिवसांपासूनचा वाद संपुष्टात आल्याची अभिनेता गोविंदाने दिली आहे. तो म्हणाला की.
“तू माझ्या लाडक्या बहिणीचा मुलगा आहेस, तिने मला खूप प्रेम दिले आहे. मी तुला ते प्रेम देऊ शकलो नाही याचे दुःख आहे. पण मी तसा नाही, माझ्या वागण्याला तुझ्या दुःखाचे कारण बनवू नकोस. नेहमी माफ करत रहा. कृपया आराम करा, मला तुमच्याशी कोणतीही अडचण नाही आणि देव नेहमी तुमचे रक्षण करो.” मनीष पॉलने पॉडकास्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये “कृष्णा माफी मागून इथे आला आहे. सर तुम्हाला त्याच्यासाठी काही सांगायचे असेल तर सांगा.” असे तो म्हणताना दिसत आहे. मनीषने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझे आवडते गोविंदा सर पॉडकास्टवर आले आणि त्यांनी सर्व तक्रारी दूर केल्या. लव्ह यू सर.” ‘लव्ह हिज टू’ अशी प्रतिक्रिया कृष्णाने पोस्टवर दिली.
कृष्णाने एका शोमध्ये आपले मामा खलनायक असल्याचे भाष्य केले होते. याचा गोविंदा चांगलाच संतापला होता. यावर बोलताना गोविंदा म्हणाला, “माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात काहीतरी चुकीचे घडत आहे, हे त्याने मान्य केले आहे.” यासोबतच गोविंदाने सांगितले होते की, त्याच्या पत्नीने त्याला कृष्णाच्या कामात ढवळाढवळ करण्यास मनाई केली आहे. ती स्वतः कृष्णाशी बोलतही नाही.
गोविंदा आणि कृष्णा यांच्यात वाद सुरू झाला जेव्हा कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहने 2018 मध्ये ट्विट केले होते की काही लोक पैशासाठी नाचतात. या ट्विटवर सुनीता आहुजा म्हणाली की, हे ट्विट गोविंदाविरोधात करण्यात आले आहे. यानंतर गोविंदा आणि सुनीताने कृष्णा आणि कश्मीरासोबतचे सर्व संबंध तोडले. 2019 मध्येही, जेव्हा गोविंदा, सुनीता आणि त्यांची मुलगी टीना कपिल शर्माच्या शोमध्ये आले, तेव्हा कृष्णा आला नाही कारण सुनीताला त्याच्यासोबत स्टेज शेअर करायचा नव्हता.