Tuesday, June 25, 2024

आमिर खानसोबत ‘सरफरोश’ चित्रपटात दिसली होती सोनाली बेंद्रे, मात्र आजही होतो ‘याचा’ पश्चात्ताप

सोनाली बेंद्रेच्या (Sonali Bendre) हास्यावर आजही लाखो हृदये फिदा आहेत. ‘द ब्रोकन हार्ट’ या वेबसीरिजद्वारे ती पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत परतली आहे. सोनालीने नव्वदच्या दशकात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत (Aamir Khan) ‘सरफरोश’सारखा हिट चित्रपट दिला होता. मात्र काम करताना ती आमिरकडून काहीच शिकली नाही, याचे तिला खूप वाईट वाटते. ही बाब खुद्द सोनालीने मान्य केली आहे.

हिट ठरली होती आमिर-सोनालीची केमिस्ट्री
सोनालीने 1999 मध्ये रिलीझ झालेल्या ऍक्शन-ड्रामा चित्रपट ‘सरफरोश’मध्ये आमिरसोबत काम केले होते. त्यात नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) आणि मुकेश ऋषीसारखे (Mukesh Rishi) कलाकारही होते. जॉन मॅथ्यू माथन निर्मित आणि दिग्दर्शित, हा चित्रपट समीक्षक आणि व्यावसायिक दोन्ही दृष्ट्या यशस्वी ठरला. आमिर आणि सोनालीची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. (sonali bendre regrets not learning from aamir khan)

आमिरकडून काहीही न शिकल्याची आहे खंत
सोनालीने आमिरबद्दल सांगितले की, “तो नेहमीच परफेक्शनिस्ट राहिला आहे. पण ‘सरफरोश’मध्ये काम करताना त्याच्याकडून काहीही शिकू न शकणे, ही माझ्या आयुष्यातील काही खंतांपैकी एक खंत आहे.” पुढे ती म्हणाली, “खरं तर मला वाटतं, जेव्हा मी आमिर खानसोबत सरफरोश केला तेव्हा मला खूप मजा आली होती. तो काय करत आहे, हे मी जवळून पाहत होते. पण त्या दिवसांत त्या क्षणांचा आनंद घेण्याची आणि त्याच्याकडून शिकण्याची परिपक्वता माझ्यात नव्हती. यादरम्यान आमिर खानकडून खूप काही शिकण्याची संधी मिळाली होती. मात्र मी त्याच्याकडून काहीही शिकू शकले नाही. याचा मला आजही पश्चाताप होतो.”

‘द ब्रोकन न्यूज’द्वारे केलं पुनरागमन
कॅन्सरशी लढा जिंकल्यानंतर सोनाली नुकतीच ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सीरिजद्वारे अभिनयाच्या जगात परतली आहे. ही सीरिज 10 जून रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाली. यात जयदीप अहलावत, श्रिया पिळगावकर, इंद्रनील सेनगुप्ता, तारुक रैना, आकाश खुराना आणि किरण कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘द ब्रोकन न्यूज’ हा ‘प्रेस’ या ड्रामा सीरिजचा अधिकृत रिमेक आहे. या सीरिजची कथा मीडिया आणि वृत्तवाहिन्यांच्या कार्यशैलीवर आधारित आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘या’ कारणामुळे सलमान खानवर प्रचंड भडकले होते नाना पाटेकर; म्हणाले, ‘…त्याची लायकी नाहीये’

‘तिरंगा’ चित्रपटासाठी नानांनी दिला होता नकार; मात्र नंतर ‘ही’ विचित्र अट सांगत भरली त्यांनी हामी

हे देखील वाचा