Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गोविंदाची रुग्णालयात घेतली भेट, झालेल्या घटनेची घेतली माहिती

मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गोविंदाची रुग्णालयात घेतली भेट, झालेल्या घटनेची घेतली माहिती

काल, मंगळवारी अभिनेता गोविंदासोबत (Govinda) अपघात झाला. मुंबईतील जुहू येथील राहत्या घरी स्वत:च्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून अचानक झालेल्या गोळीमुळे अभिनेता जखमी झाला. गोविंदाच्या पायात गोळी लागली. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याच्या पायाची गोळी काढली आणि आता तो धोक्याबाहेर आहे. आज बुधवारी मुंबई क्राइम ब्रँचची टीम अभिनेत्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. यादरम्यान टीमने गोविंदाकडून घटनेची माहिती घेतली.

हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, गुन्हे शाखेच्या पथकाने अभिनेत्याची रुग्णालयात भेट घेतली आणि घटनेची माहिती घेतली. स्थानिक पोलीस तपास करत असतानाच मुंबई गुन्हे शाखेनेही या घटनेचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दिली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

गोविंदाला पाहायला मुलगी टिनासह या कलाकारांनी लावली हॉस्पिटलला हजेरी
‘खतरों के खिलाडी 14’चा विजेता करण वीर मेहरावर भडकला असीम रियाझ, वापरले अपमानास्पद शब्द

हे देखील वाचा