Wednesday, December 6, 2023

दु:खद! ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायकाचे निधन, वयाच्या 59व्या वयात घेतला जगाचा निरोप

हॉलिवूडमधून एकापाठोपाठ एक अशी धक्कादायक बातमी येत आहे. अभिनेता रॉबर्ट कॉर्मियर याचे 33 व्या वर्षी 23 सप्टेंबर निधन झाले होते. अशात आता यूएसचा रॅपर कुलियो याचे 28 सप्टेंबर रोजी निधन झाल्याचे वृत्त आहे. तो 59 वर्षांचा होता. त्याचे पूर्ण नाव आर्टिस लियोन आयवी ज्युनिअर असे आहे. त्याचे निधन लॉस एंजेलिस येथे झाले. त्याच्या निधनाची बातमी त्याचा मॅनेजर जारेस पोसी याने दिली. मात्र, त्याच्या निधनामागील कारण अद्याप समोर आले नाही.

रॅपर कुलियो (Rapper Coolio) 1995मध्ये आलेल्या ‘गँगस्टा पॅराडाईज’ (Gangsta’s Paradise) या हिट गाण्यासाठी प्रसिद्ध होता. कुलियोच्या एका मित्रानुसार, त्याच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्याचे निधन कशामुळे झाले, हे सांगण्यात आले नाही. पोसी कुलिओचा मॅनेजर असल्यासोबतच त्याचा जवळचा मित्रदेखील होता.

कुलिओचा मॅनेजर जारेज पोसी याने एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, बुधवारी (दि. 28 सप्टेंबर) रॅपर आपल्या मित्राच्या घरी गेला होता. तिथे तो त्याच्या बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळला. 80च्या दशकात रॅपर म्हणून आल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या आर्टिस लियोन (Artis Leon Ivey Jr) याला 1995मध्ये ‘डेंजरस माईंड’मधील साऊंट ट्रॅक ‘गँगस्टाज पॅराडाईज’मधून प्रसिद्धी मिळाली होती. इतकेच नाही, तर त्याच्या सोलो परफॉर्मन्ससाठी त्याला ग्रॅमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. याव्यतिरिक्त त्याच्या नावावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला होता.

हेही वाचा- रिक्षा चालकाची मुलगी झाली अभिनेत्री, ‘प्रेम म्हणजे काय असतं’ चित्रपटातून करणार पदार्पण 

मोनेसेनमध्ये जन्मला होता कुलिया
रॅपर कुलिया याचा जन्म पिटसबर्ग येथील दक्षिण पेन्सिल्वेनिया येथील मोनेसेन येथे झाला होता. त्याचा जन्म 1 ऑगस्ट, 1963 रोजी झाला होता. तो आपल्या शिक्षणासाठी कॅलिफोर्नियाला गेला होता. तिथे त्याने वेगवेगळ्या कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. माध्यमांतील वृत्तांनुसार, जेव्हा तो तरुण होता, तेव्हा तो विक्षिप्तपणाचा व्यसनी होता. मात्र, स्वत:च्या भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी आणि वाईट सवयींतून बाहेर येण्यासाठी त्याने लॉस एंजेलिसच्या विमानतळावर फायर फायटर म्हणून नोकरी केली होती. मात्र, काही काळानंतर त्याने आपल्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी संगीताची कास धरली.

‘गँगस्टा पॅराडाईज’च्या यशानंतर कुलियोने अनेक गाणे बनवले, ज्यामधून त्याला प्रसिद्धी मिळाली. त्याच्या गाण्यांच्या यादीत ‘Aw’, ‘Here It Goes!’, ‘My Soul’, ‘Kenan’ आणि ‘Kel’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गुन्हा कबूल करणार की नवा डाव खेळणार? ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा थरारक टिझर आला समोर
कपिल शर्माच्या कार्यक्रमात येण्यास ऐश्वर्याचा नकार, कारण सलमान खान? पाहा काय आहे प्रकरण

हे देखील वाचा