Saturday, April 20, 2024

गुन्हा कबूल करणार की नवा डाव खेळणार? ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा थरारक टिझर आला समोर

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘दृश्यम 2’ चा ग्रेट रिकॉल टीझर रिलीज झाला आहे. 2015 मध्ये आलेल्या अजयच्या ‘दृश्यम’ या चित्रपटाच्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचा दुसरा पार्टही आणला आहे. सस्पेन्सने भरलेला ‘दृश्यम 2’चा हा टीझर व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. तसेच या टीझरमध्ये अजय देवगण आपला गुन्हा कबूल करताना दिसत आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अजय देवगणने (Ajay Devgn) गुरुवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा रिकॉल टीझर व्हिडिओ रिलीज केला. याला रिकॉल म्हटले जात आहे कारण या संपूर्ण व्हिडिओमध्ये दृश्यम 1  बरेच सीन्स पाहायला मिळतील. आयजी मीरा देशमुख (तब्बू) यांचा एकुलता एक मुलगा समीर देशमुख विजय साळगावकर (अजय देवगण) यांच्या कुटुंबात कसा वादळ बनून येतो. यातून सुटका करून घेण्यासाठी साळगावकर कुटुंबाला या वादळाचा सामना करावा लागतो आणि त्याच दरम्यान समीरचा मृत्यू होतो.

पहिल्या भागात विजय आणि त्याचे कुटुंब पोलिसांपासून कसे सुटतात आणि हे हत्येचे गूढ सस्पेन्समध्ये कसे संपवतात, पण ‘दृश्यम 2’ मध्ये साळगावकर कुटुंबाचे प्रकरण पुन्हा उघडताना पाहायला मिळते. या टीझरमध्ये अजय देवगण ‘माझे नाव विजय साळगावकर आहे आणि ही माझी कबुली आहे’ असे म्हणताना दिसत आहे. दृश्यम 2 चा हा नेत्रदीपक थ्रिलर टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

चित्रपटात अजय देवगण, दक्षिण अभिनेत्री श्रेया सरन, इशिता दत्ता, तब्बू आणि अक्षय खन्ना ही स्टारकास्ट म्हणून ‘दृश्यम 2’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ येत्या 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांनाही या चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –कपिल शर्माच्या कार्यक्रमात येण्यास ऐश्वर्याचा नकार, कारण सलमान खान? पाहा काय आहे प्रकरण
प्रदर्शनाआधीच ‘पोन्नियिन सेल्वन -1’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, थिएटर मालकांना मिळाली धमकी
अबब! विक्रम वेधासाठी ऋतिक रोशनने घेतले इतके कोटी, सैफ अली खानला टाकले मागे

हे देखील वाचा