Friday, August 1, 2025
Home अन्य ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये आपल्या आजी- आजोबांसमोर स्पर्धक दाखवणार आपल्या अभिनयाचा जलवा

‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये आपल्या आजी- आजोबांसमोर स्पर्धक दाखवणार आपल्या अभिनयाचा जलवा

सोनी टीव्हीवर सध्या सुरू असलेल्या ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्ये या आठवड्यात एक विशेष भाग रंगणार आहे. हा भाग स्पर्धकांच्या आजी-आजोबांवर आधारित असल्याने या भागाला ‘ग्रँड पॅरेंट्स स्पेशल’ भाग म्हणून साजरे केले जाणार आहे. या विशेष भागामध्ये, स्पर्धकांचे आजी- आजोबा किंवा या दोघांपैकी कोणीही एकजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करताना दिसणार आहेत.

या विशेष भागात, स्पर्धकांकडून काही जबरदस्त परफॉर्मन्स देखील स्टेजवर सादर केले जाणार आहेत. या शोचे परीक्षक असलेले शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू हे या विशेष भागात नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसोबत, स्पर्धकांसोबत मजा- मस्ती करताना दिसणार आहेत. या भागात डोळ्यात पाणी आणणारे देखील अनेक क्षण आपल्याला दिसणार आहे. आज जिथे आजी-आजोबांना घरातील अडगळ समजले जाते, तिथेच या भागातून आजी- आजोबा आणि त्यांच्या नातवांमधील नाते, त्यांच्यातले प्रेम जगासमोर येणार आहे. (Super dancer chapter 4 grand parents special week)

या ‘ग्रँड पॅरेंट्स स्पेशल’ आठवड्यात अमित त्याचा सुपर गुरु असलेल्या अमरदीपच्या ऐवजी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’चा विजेता असणाऱ्या टायगर पॉपसोबत डान्स करताना दिसणार आहे. त्यामुळे आता या दोघांच्या जोडीवर परीक्षक काय बोलतील, हे बघणे महत्वाचे असेल. दोन उत्कृष्ट डान्सर सोबत येणार म्हटल्यावर धमाका तर नक्कीच होईल.

या शोमधील स्पर्धक असणारा संचित त्याची सुपर गुरु असणाऱ्या वर्तिकासोबत एक खूपच भावनिक डान्स परफॉर्मन्स देणार आहे. त्याचा डान्स पाहून संपूर्ण वातावरण भावनिक झाले आणि, सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. त्याचा डान्स झाल्यानंतर त्याच्या आजीने शोमध्ये येऊन त्याला सरप्राइज दिले.

तर अर्शिया तिच्या सुपर गुरु अनुराधासोबत ‘तुम मिले’ गाण्यावर डान्स करताना दिसणार असून, या डान्समधून ती तिच्या आजीला ट्रिब्यूट देणार आहे. नेहमी आपल्या डान्समधून काहीतरी वेगळे दाखवणाऱ्या या दोघींनी या वेळेला देखील अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी गोष्ट त्यांच्या डान्समधून दाखवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा