Thursday, June 13, 2024

महाभारत फेम ‘या’ अभिनेत्याची तब्येत बिघडली, गंभीर परिस्थिती केले रुग्णालयात दाखल

अनेक मालिका आणि चित्रपटांमधून विविध भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले गुफी पेंटल यांच्याबद्दल एक बातमी येत आहे. गुफी यांना ‘महाभारत’ मालिकेतील त्यांच्या ‘शकुनी मामा’ या भूमिकेसाठी खासकरून ओळखले जाते. अचानक ते चर्चेत येण्याचे कारण म्हणजे गुफी यांची तब्येत सध्या बरी नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांना गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. गुफी हे मागील बऱ्याच काळापासून एका आजाराशी दोन हात करत आहे. आता त्यांची तब्येत जास्त खराब झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. त्यांच्या तब्येतीबद्दल टीव्ही अभिनेत्री टीना घईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

टीना घईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून गुफी पेंटल यांचा एक फोटो शेअर करत त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. टीनाने या पोस्टमध्ये लिहिले, “गुफी पेंटलजी त्रासात आहे प्रार्थना करा. ओम साई राम.” या पोस्टनंतर गुफी यांच्या समर्थकांनी त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत त्यांना काय झाले? असे प्रश्न कमेंट्समध्ये विचारले आहे. गुफी पेंटल आणि त्यांच्या कुटुंबाने तब्येतीबद्दल जास्त माहिती देण्यास नकार दिला असल्याचे देखील टीनाने यावेळी सांगितले.

दरम्यान गुफी पेंटल यांनी १९८० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. टीव्हीवर देखील अनेक मालिका त्यांनी केला. त्यांना महाभारतातील शकुनी मामा या भूमिकेनंतर संपूर्ण देशात ओळख मिळाली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

HAPPY BIRTHDAY | भारद्वाज श्रीकृष्ण नव्हे तर विदुरच्या ऑडिशनला गेले होते, काम न मिळाल्याने आली होती निराश

हे देखील वाचा