Wednesday, February 4, 2026
Home बॉलीवूड ‘उद्योगपती धीरूभाई अंबानी’ यांच्या खऱ्या प्रेमकथेवर आधारित आहे ‘हा’ चित्रपट

‘उद्योगपती धीरूभाई अंबानी’ यांच्या खऱ्या प्रेमकथेवर आधारित आहे ‘हा’ चित्रपट

बॉलीवूडचे रोमँटिक चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही अनेकदा विचार केला असेल की, ‘हे किती सुंदर आहे, पण हे फक्त चित्रपटांमध्येच घडते’. तथापि, असे काही बॉलिवूड चित्रपट आहेत जे वास्तविक जीवनातील प्रेमकथांवर आधारित आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या खऱ्या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाबद्दल सांगणार आहोत.

2007 मध्ये रिलीज झालेला ‘गुरु’ हा चित्रपट उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या वास्तविक जीवनावर आधारित होता. मणिरत्नम दिग्दर्शित या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, मिथुन चक्रवर्ती, विद्या बालन, आर माधवन आणि रोशन सेठ असे अनेक कलाकार दिसले. या चित्रपटातील अभिषेकची भूमिका धीरूभाई अंबानी यांच्यावर आधारित होती, तर ऐश्वर्याने त्यांची पत्नी कोकिलाबेन अंबानी यांची भूमिका साकारली होती.

धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी कोकिलाबेन यांनी धीरूभाई अंबानी सर्वात श्रीमंत भारतातल्या व्यक्ती होण्याच्या प्रवासात पतीला नेहमीच साथ दिली. त्याचप्रमाणे, या चित्रपटातील ऐश्वर्याचे पात्र देखील अभिषेकच्या संघर्षाच्या दिवसात त्याच्या व्यक्तिरेखेसाठी एक ताकदीचा आधारस्तंभ होता. या चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले होते, ज्याला फिल्मफेअर पुरस्कार आणि आयफा पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट संगीत’ आणि ‘बेस्ट बॅकग्राउंड स्कोअर’साठी पुरस्कार मिळाले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘खान असता तर लगेच…’, एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्यावर भडकले दिग्दर्शक
‘या’ सुपरस्टारला हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला वाढदिवस; मेडिकल स्टाफसोबतचा फोटो शेअर करत दिली अपडेट

हे देखील वाचा