व्यावसायिक आयुष्यात दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, लेखक यांसारख्या अनेक भूमिका निभावणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरू दत्त. त्यांचे करिअर खूप लांब लचक होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. आज गुरू दत्त यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म ९ जुलै १९२५ मध्ये बंगळूरू येथे झाला होता. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबाबत अधिक माहिती. (Guru Dutt’s birth anniversary, let’s know about his life)
बंगळूरूमध्ये जन्म झालेल्या गुरू दत्त यांचे खरे नाव वसंत कुमार शिवशंकर पदुकोण हे होते. त्यांचे शालेय शिक्षण कोलकत्तामध्ये पूर्ण झाले. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका कंपनीमध्ये टेलीफोन ऑपरेटरची नोकरी केली. पण तिथे काही त्यांचे मन रमले नाही. काही तरी वेगळे करून दाखवायच्या महत्वाकांक्षेने ते पुण्याला निघून गेले. त्यांना सुरुवातीपासूनच अभिनयात रस होता. त्यानंतर १९४५ साली त्यांना प्रभात नावाच्या एका कंपनीत काम मिळाले. त्यांनी ‘लाखारानी’ या चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका वर्षातच त्यांना ‘हम एक है’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक आणि कोरीओग्राफरची जबाबदारी मिळाली. त्यानंतर १९४७ मध्ये या कंपनी सोबतचा त्यांचा करार संपला.
यानंतर त्यांना देव आनंद यांच्या कंपनीत काम मिळाले. गुरू दत्त यांनी या कंपनीतून ‘बाज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांचा हा चित्रपट सुपरहिट झाला होता. यानंतर त्यांनी ‘जाल’ आणि ‘बाज’ हे दोन चित्रपट बनवले, पण ते फ्लॉप झाले होते. ‘बाज’ या चित्रपटातून ते पहिल्याच वेळेस हीरो म्हणून पडद्यावर आले होते. याच दरम्यान त्यांचे देव आनंद यांच्याशी मतभेद झाले आणि त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली. त्यांच्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनवलेला त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे ‘आर पार’. त्यांचा हा चित्रपट देखील चांगलाच गाजला होता. त्यानंतर त्यांची गाडी मात्र चांगलीच रुळावर आली त्यांनी ‘मिस्टर अँड मिसेस ५५’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चांद’ यांसारखे अनेक चित्रपट बनवले. ‘साहब बिवी और गुलाम’ या चित्रपटानंतर तर त्यांनी इतिहास रचला होता.
‘बाज’ चित्रपटादरम्यान गुरू दत्त यांची नजर गीता दत्त याच्याशी मिळाली. त्यावेळी गुरू दत्त या क्षेत्रात नवीन होते आणि गीता यशाच्या शिखरावर पोहचल्या होत्या. त्या दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले. गुरू दत्त आणि गीता दत्त यांना तीन मुलं आहेत.
परंतु दोघांमध्ये होणाऱ्या मतभेदामुळे त्यांच्यातील प्रेम कमी झाले. ‘प्यासा’ या चित्रपटादरम्यान ते वहिदा रहमानकडे आकर्षित झाले. त्यावेळी ते गीतापासून दूर आणि वहिदा यांच्याजवळ जावू लागले.
माध्यमातील वृत्तानुसार, गुरू दत्त आणि वहिदा यांच्या अफेअरमुळे त्यांच्या घरातील वातावरण खूप बिघडले होते. परंतु वहिदा यांना माहित होते की, गुरू दत्त यांचं लग्न झाले आहे. त्यामुळे त्या स्वतःहून त्यांच्यापासून लांब गेल्या. परंतु गुरू दत्त आणि गीता यांच्यामधील वाद काही कमी झाले नाही आणि त्या मुलांना घेऊन निघून गेल्या. यानंतर गुरू दत्त यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. अखेर ती काळी रात्र आली. १० ऑक्टोंबर १९६४ ची रात्री, गुरू दत्त हे दारू पिऊन झोपले ते परत कधीच उठले नाहीत. त्यांच्या मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या केली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘यार गजब आहेस तू’, श्रुती मराठेच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची झक्कास कमेंट
-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’