अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू


टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री शगुफ्ता अली या एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. गेल्या 4 वर्षांपासून त्या‌ आजारी आहे. तसेच त्या सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहेत. त्यांनी अभिनेता सोनू सूदकडे मदत मागितली होती, पण त्याने मदत केली की नाही याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. यातच अशी बातमी समोर आली आहे की, कॉमेडियन जॉनी लिव्हर आणि अभिनेता शिविन नारंग यांनी त्यांची मदत केली आहे.

वृत्तानुसार, त्यांनी माध्यमांना मुलाखत देताना जॉनी लिव्हर आणि शिविन नारंग यांचे नाव घेतले होते. त्यांनी सांगितले की, जॉनी लिव्हरला जेव्हा त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत समजले, तेव्हा त्याने कॉल करून लगेच त्यांना मदतीसाठी विचारणा केली. यासोबतच शगुफ्ता यांची सीनियर अभिनेत्री मधुमती कपूर, शशांक शेठी, शिविन नारंग यांचे देखील त्यांनी नाव घेतले आहे. शगुफ्ता यांनी इंडस्ट्रीमध्ये 30 वर्ष काम केले आहे. त्यांनी 15 पेक्षाही अधिक लोकप्रिय चित्रपटात आणि 20 मालिकांमध्ये काम केले आहे. पण आज त्यांच्याकडे काहीच काम नसल्याने त्यांना आर्थिक तंगीमधून जावे लागत आहे. (Johnny lever and shivin Narang come forward to help shagufta ali)

गेल्या 4 वर्षात घर चालवण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरातील अनेक वस्तू देखील विकल्या आहेत. यामध्ये कारचाही समावेश आहे. पण आता त्यांच्याकडे अजिबात पैसे राहिलेले नाही. ज्यातून त्या त्यांच्या आजारावर उपचार करू शकतात. त्यांना थर्ड स्टेजचा कॅन्सर होता. त्यांनी सांगितले की, त्या पहिल्याच वेळेस माध्यमांशी याबाबत चर्चा करत आहेत. त्यांच्या या परिस्थितीबाबत कोणालाच कल्पना नव्हती. तसेच इंडस्ट्रीमधील खूप कमी लोक त्यांचे जवळचे मित्र होते. ज्यावेळी त्यांच्याकडे खूप काम होते, तेव्हा अचानक एक दिवशी त्यांना समजले की, त्यांना स्तनाचा कॅन्सर झाला आहे आणि त्या आता तिसऱ्या स्टेजला आहेत. त्यांना ती कॅन्सरची गाठ काढण्यासाठी एक मोठी सर्जरी करावी लागली होती.

या काळात त्या अनेक कठीण परिस्थितीतून गेल्या आहेत तसेच 6 वर्षापूर्वी त्यांना समजले की, त्यांना मधुमेह आहे. तेव्हापासूनच त्यांच्या आरोग्याबाबत अनेक गोष्टी उद्भवतात. मधुमेहाचा त्यांच्या पायांवर खूप परिणाम झाला आहे. त्यांचे पाय एकदम सुन्न असतात. कधी कधी खूप दुखतात. तणावाच्या परिस्थितीत त्यांची शुगर लेव्हल वाढली आणि याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर झाला आहे. त्यासाठी देखील त्यांना उपचार करायचा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर


Leave A Reply

Your email address will not be published.