Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड गुरू रंधावाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! २९ वर्षीय गायक आता अभिनेता म्हणून बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज

गुरू रंधावाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! २९ वर्षीय गायक आता अभिनेता म्हणून बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार गुरू रंधावा याची गाणी जगभरात पसंत केली जातात. त्याचा चाहतावर्ग देखीस भलामोठा आहे. नुकतीच गायकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत गुरू फक्त त्याच्या म्युझिक व्हिडिओमध्येच दिसायचा. मात्र आता तो पहिल्यांदाच एका हिंदी म्युझिकल फीचर फिल्ममध्ये दिसणार आहे. होय, २९ वर्षीय गुरू रंधा वा आता अभिनेता म्हणून बॉलिवुडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाला आहे. हा चित्रपट एका तरुण संगीतकाराची कथा असेल, जो गरिबीतून बाहेर पडून आपले नाव कमावतो.

आपल्या पदार्पण चित्रपटाविषयी बोलताना गुरू म्हणाला की, “मी नवीन काम करण्यास खूप उत्सुक आहे. एक कलाकार म्हणून, मला नेहमीच नवीन सर्जनशील मार्ग शोधण्याची आणि माझ्या क्षमता वाढविण्याची इच्छा आहे. या चित्रपटात काम करण्याचा निर्णय स्वाभाविक होता आणि मला माझी कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे, याबद्दल मी आभारी आहे.” (guru randhawa ready to make debut as an actor in a hindi)

गुरू पुढे म्हणाला की, “नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणे नेहमीच एक आव्हान असते आणि माझे सर्व स्वप्न माझ्या या ड्रीम प्रोजेक्टमध्ये टाकण्यासाठी मी खूप उत्साही आहे. मला खात्री आहे की चाहत्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.”

गुरूच्या या आगामी चित्रपटाचे कास्टिंग अद्याप झाले नाही. या चित्रपटाबाबत कोणत्याच कलाकाराचे नाव निश्चित झाले नाही. या चित्रपटाची निर्मिती एंडेमॉल शाईन इंडियाने केली आहे. निर्मात्यांचा असा दावा आहे की, या चित्रपटाच्या कथेव्यतिरिक्त त्याच्या गाण्यावर आणि संगीतावर लक्ष केंद्रित केले गेले असेल. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होईल, असे सांगितले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा