Thursday, July 24, 2025
Home बॉलीवूड …म्हणून अहान शेट्टीला वाटते वडील सुनील शेट्टीने करू नये त्याच्या चित्रपटाची निर्मिती, वाचा सविस्तर

…म्हणून अहान शेट्टीला वाटते वडील सुनील शेट्टीने करू नये त्याच्या चित्रपटाची निर्मिती, वाचा सविस्तर

स्टार किड्स अनेकदा त्यांच्या सुपरस्टार पालकांकडून मोठ्या प्रमाणावर लॉन्च केले जातात. ही मालिका बॉलिवूडमध्ये नवीन नाही. पण, अहान शेट्टी हा असाच एक स्टारकिड आहे ज्याला त्याचा पहिला चित्रपट त्याचे वडील सुनील शेट्टी यांनी बनवावा असे कधीच वाटले नाही. २०२१ मध्ये ‘तडप’ मधून पदार्पण करणाऱ्या अहान शेट्टीने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सुनील शेट्टीने आपले चित्रपट तयार करू नयेत, असा आग्रह धरला. याबाबत अहान शेट्टीने आता उघडपणे चर्चा केली आहे.

मुलाखतीत अहान शेट्टी म्हणाला की, “मला वाटत नाही की, मी माझ्या वडिलांवर असा दबाव टाकला असेल. मला वाटतं जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत काम करता तेव्हा तुम्ही कुठेतरी व्यावसायिकता गमावता कारण तुम्ही त्यांना पाहिजे ते करता आणि त्यांच्याशी सहमत होता. नातेसंबंध आणि व्यावसायिक जीवन यातील रेषा धूसर होऊ नये असे मला वाटत आहे.” अहान शेट्टीने त्याच्या पुढील योजनांबद्दलही सांगितले.

सुनील शेट्टी भविष्यात निर्माता होण्याच्या प्रश्नावर अहान शेट्टी म्हणाला की, “भविष्यात माझ्या वडिलांना माझ्या चित्रपटाचा निर्माता व्हायचे असेल तर मला ते आवडेल. मात्र यावेळी माझ्या करिअरमध्ये किंवा मी जे काही करतो त्यात माझ्या कुटुंबाचा सहभाग नसावा हेच उत्तम.अहान शेट्टीनेही चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाशी संबंधित असलेल्या फायद्यांबाबत सहमती दर्शवली. अहान शेट्टी म्हणाला की तो त्याच्या कुटुंबाकडून मिळणाऱ्या ऑफर्सवर सर्जनशील इनपुटवर चर्चा करतो आणि विशेषत: वडील आणि बहिणीचे मत देखील घेतो.

पण तो चित्रपटांना घरातल्या चर्चेचा भाग बनवत नाही, असेही तो म्हणाला. अहान शेट्टी म्हणाला, “मी स्क्रिप्ट घेऊन त्याच्याकडे जातो कारण तोही त्याच क्षेत्रातला आहे. पण आपण फक्त त्याबद्दलच बोलतो असे नाही. त्यापेक्षा फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित गोष्टी कमी करायच्या आहेत. आमच्यासाठी हे महत्वाचे आहे की आम्ही घरी काम आणत नाही. अशाप्रकारे त्याने त्याचे मत व्यक्त केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा