Friday, March 29, 2024

ऐश्वर्या रायने ‘या’ चित्रपटात केले होते सुनील शेट्टीसोबत काम, परंतु असे काय झाले की, चित्रपटाची शूटिंग केली बंद

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि सुनील शेट्टी यांना एकदा ‘हम पंछी एक डाल के’ या चित्रपटासाठी कास्ट केले होते. परंतु दिग्दर्शकाने हा चित्रपट सोडून दिला. माध्यमातील वृत्तानुसार निर्मात्याने हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी इतर दिग्दर्शकांची मदत घेतली होती. परंतु त्याने काही फायदा झाला नाही. या चित्रपटात ऐश्वर्या रॉय एका गॅरेज मालकिनीच्या रोलमध्ये होती. तसेच आशुतोष राणा हे अर्धा जनावर आणि अर्धा माणूस या भूमिकेत होते.

ऐश्वर्याने दिलेल्या एका मुलाखतीत सुनील आणि शशिलालसोबत काम करण्याची गोष्ट कबूल केली होती. तिने सांगितले होते की, “सुनील लहान मुलासारखा आहे. तो खूप मस्ती करतो. स्क्रीनवर नेहमीच भांडताना दिसलो आहोत. ते गंभीर व्यक्तिमत्त्व नाही. त्यांच्यासोबत काम करणे हे एका पिकनिकप्रमाणे आहे. ” तेव्हा ऐश्वर्याला विचारण्यात आले की, त्या चित्रपटात ती एका मॉर्डन आणि वेस्टर्न मुलीची भूमिका निभावत होती का? यावर तिने उत्तर दिले की, “असे काही नाही ती केवळ एक गॅरेज मालकीण होती.” (Aishwarya Rai once shot a film with Suniel shetty)

आशुतोषने या चित्रपटात काम करण्याची उत्सुकतेसोबत म्हटले होते की, “ही गोष्ट आपली बालपणीची कल्पना पुन्हा एकदा जगल्यासारखी आहे.” शशिलाल हा चित्रपट ७५ % बनल्यानंतर बाहेर पडले होते. त्यानंतर या चित्रपटाचे काम बंद झाले. निर्माता राहुल गुप्ताने चित्रपट पूर्ण करण्यासाठी बाकी दिग्दर्शकांची मदत घेतली परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

जेव्हा परदेशात या चित्रपटाची शूटिंग चालू होती तेव्हा एक दुर्घटना घडली होती. ॲक्शन दिग्दर्शक रवी दिवाण यांनी एकदा सांगितले होते की, “जेव्हा आम्ही सुनील शेट्टी आणि ऐश्वर्या रायचा चित्रपट ‘पंछी एक डाल के’ परदेशात शूट करत होतो. तेव्हा मी हॉलिवूडमधील एक मुलगा स्कॉटला कॅमेरा नीट ठेवण्यासाठी सांगितले. परंतु त्याने माझे ऐकले नाही आणि कॅमेरा खाली पाडला. त्यामुळे सेफ्टी डायरेक्टरची गरज लागते.” अशाप्रकारे त्यांनी त्यांचा परदेशात शूटिंग करण्याचा अनुभव सांगितला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा