कलाकार जेवढे मोठे तेवढे त्यांचे शौक मोठे असतात. चित्रपटांच्या शूटिंगच्या निमित्ताने कलाकार २४*७ कामातच व्यस्त असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाला देखील वेळ देता येत नाही. मात्र जेव्हा जेव्हा त्यांना जमेल तेव्हा तेव्हा ते स्वतःसाठी, घरच्यांसाठी वेळ काढतात आणि सुट्यांसाठी बाहेर जातात. बरेच कलाकार फिरण्यासाठी सुट्यांसाठी एखादे कारण काढुन जातांना दिसतात. बहुतकरून कलाकारांचा वाढदिवस हे त्यांना फिरण्यासाठी एखाद्या ठिकाणी जाणून मजा करण्यासाठी उत्तम कारण असते.
अशाच एका अभिनेत्रीने नुकताच तिचा वाढदिवस मालदीवला जात साजरा केला. ही अभिनेत्री आहे हिंदी आणि साऊथ स्टार हंसिका मोटवानी. हंसिकाने नुकताच तिचा ३० वा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस तिने तिच्या जवळच्या लोकांसोबत मालदीवला जात साजरा केला. या सुट्यांचे अनेक फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. हंसिकाने यात तिचा बिकिनी घातलेला फोटो देखील पोस्ट केला आहे. (hansika motwani shared her bikini photo)
गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये हंसिका तिची फिगर फ्लॉन्ट करताना फोटोंमध्ये दिसत आहे. या फोटोंसोबत तिने इतर अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या ट्राउझरमध्ये दिसत असून, यावर तिने ब्रालेट क्रॉप टॉप घातला आहे. तिचे हे सर्व बोल्ड आणि ग्लॅमर्स फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
बालकलाकारापासून हंसिकाने तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. टीव्हीवर ती ‘शाका लाका बूम बूम’, ‘हम कौन हैं’ या मालिकांमध्ये तर ‘कोई मिल गया’सोबत इतर अनेक चित्रपटांमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर ती हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. सिनेमा फ्लॉप ठरला आणि हंसिकाचे करियर देखील फ्लॉप झाले. मग तिने तिचा मोर्चा साऊथ चित्रपटांकडे वळवला. इथे तिने २००७ साली अल्लू अर्जुनच्या ‘देसमुदुरु’ या चित्रपटातून प्रवेश केला. हा सिनेमा तुफान गाजला आणि हंसिकाचे नशीब पालटले. आज हंसिका साऊथमधील सुपरस्टार असून इथे तिचे मंदिर देखील बनवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
–सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…
–मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल










