Monday, July 1, 2024

सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत ‘हनुमान’ने केली ‘एवढी’ कमाई, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘हनुमान’ चित्रपटाने दमदार सुरवात करत, पहिल्या तीनच दिवसात प्रचंड कमाई केली आहे. याच सोबत २०२३मध्ये रिलीज झालेल्या ‘कांतारा’ आणि ‘केजीएफफ’ यासररख्या सुपरहिट चित्रपटांच्या हिंदी बेल्ट कलेक्शनमध्ये मागे पाडले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हनुमानची सर्वत्र चर्चा होती. कमी बजेट असून सुद्धा या चित्रपटातील वीएफएक्स उत्तम आहेत. ओपनिंग वीकेंडमध्ये केजीएफ आणि कांतारा सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना देखील हनुमानने मागे टाकले आहे. फक्त तीन दिवसांच्या बिजनेसमध्ये हनुमान २०२४चा पहिला सुपरहिट चित्रपट बनला आहे.

एका रिपोर्टनुसार, हनुमानने हिंदी बेल्टमध्ये कांतारा, केजीएफ:चाप्टर१ ला मागे टाकले आहे, तर पुष्पा:द राइजच्या जवळ पोहचली आहे.

ओपनिंग विकेंडची कमाई

हनुमानच्या हिंदी वर्जनने शुक्रवारी २.१५ करोड, शनिवारी ४.०५ करोडची कमाई केली आहे.तर रविवारी ६.०६ करोडचा बिजनेस केला. याच सोबत हिंदी बेल्टमध्ये  हनुमानने १२.२६ करोड कमवले.

कांतारा आणि केजीएफचा बिजनेस

२०२३मध्ये आलेल्या कांताराबद्दल बोलायच झाल तर, चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला ७.५२ करोड एवढा गल्ला जमवला होता. तर केजीएफ:चाप्टर१ने ९.२० करोड कमवले. तर अल्लु अर्जुनच्या पुष्पा:द राइजने ओपनिंग वीकेंडच कलेक्शन १२.६८ करोडचा गल्ला जनवला.

हनुमानचा बिजनेस

वृत्तसंथेच्या अवहालानुसार, चित्रपटाने तिन दिवसात ४० करोड नेट कलेक्शन केल आहे. हिंदीमध्ये १२.२६ करोड, तेलगुमध्ये २८.२१ करोड, तमिलमध्ये ०.१९ करोड, कन्नड आणि मल्याळममध्ये अनुक्रमे ०.१९, ०.०६ एवढा बिजनेस केला आहे.

हनुमानची स्टारकास्ट

प्रशांत राय दिगदर्शीत हनुमानया चित्रपटात तेजा सच्चा मुख्य भुमिकेत दिसतो आहे तर, वारालक्ष्मी सरतकुमाार, विनय राय आणि अमृता अय्यरयांच्या सुद्धा महत्वाच्या भुमिकेत आहे. वेंकट कुमार जेट्टी लाइन प्रोड्युसर आहेत. तर कुशल रेड्डी असोसिएट प्रोडूसर अहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

शाहीद कपूर आणि क्रिती सेननच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, क्रितीच्या चाहत्यांसाठी असणार खास सरप्राईज
Suniel Shetty In Mahakal | भगवान महाकालच्या दरबारात पोहोचला सुनील शेट्टी; म्हणाला ‘देशातील ही सर्वोत्तम वेळ आहे..’

हे देखील वाचा