Thursday, July 24, 2025
Home बॉलीवूड हॅपी बर्थडे! जन्म दाखल्यावर ‘बाबा बच्चन’ असं नावं असणारा अभिषेक बनणार होता एलआयसी एजंट, वाचा ‘ज्युनियर बच्चनचा’ जीवन प्रवास

हॅपी बर्थडे! जन्म दाखल्यावर ‘बाबा बच्चन’ असं नावं असणारा अभिषेक बनणार होता एलआयसी एजंट, वाचा ‘ज्युनियर बच्चनचा’ जीवन प्रवास

बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांचा मुलगा आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन हा आज (5 फेबु्वारी) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेकने 45 वर्षात पदार्पण केले आहे. अभिषेकच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे 2021 मध्ये अभिषेकने बरेच सिनेमे साईन केले आहेत. त्यामुळे आगामी काळात तो चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 2020 मध्ये अभिषेक बच्चन याचा ‘लुडो’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. याशिवाय तो वेबसीरिज ‘ब्रीद’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये निदर्शनास आला. या वर्षी देखील अभिषेकचे अनेक सिनेमे रिलीझ होणार आहे. ज्यांची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. त्याचे चाहते देखील अभिषेकचे आगामी सिनेमे पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. चला तर अभिषेक बच्चनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.

ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन याचं त्याच्या जन्मपत्रिकेवर नाव अभिषेक ऐवजी ‘बाबा बच्चन’ हे आहे. तसेच प्रियांका चोप्रा हिला संपूर्ण जग ज्या ‘पिगी चोप’ या नावाने ओळखतं. ते नाव इतर कोणी नाहीतर अभिषेक बच्चन यानेच तिला दिले आहे. ‘दोस्ताना’ या चित्रपटाच्या दरम्यान त्या दोघांमधील मैत्री चांगलीच घट्ट झाली होती, तेव्हा अभिषेकने प्रियांकाला हे टोपणनाव दिले होते.

ही गोष्ट खूप कमी चाहत्यांना माहित असेल आणि खूप कमी प्रेक्षक यावर विश्वास ठेवतील की, अभिषेक एक उत्कृष्ट अभिनेत्यासोबत एक चांगला प्लेबॅक सिंगर देखील आहे. त्याने 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्लफमस्टर’ या चित्रपटाला आवाज दिला आहे.

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ या चित्रपटातील गाजलेले गाणं ‘खायके पान बनसार वाला’. या गाण्यावरच्या डान्सच्या स्टेप अभिषेक बच्चन यांच्याच आहेत. त्यावर अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, ‘बाबा जेव्हा लहान होता, तेव्हा तो खेळताना डान्सच्या या स्टेप्स करायचा.’

चित्रपटसृष्टीत येण्याआधी अभिषेक बच्चन हा एक एलआयसी एजंट म्हणून काम करत होता. परंतु त्या नंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही अनेक प्रेक्षकांना माहित नाहिये की, अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज कसे केले होते?, तर अभिषेकने ऐश्वर्याला सेम तसंच रिंग देऊन प्रपोज केलं होतं, जस त्याने त्याच्या ‘गुरू’ या चित्रपटात पात्र निभावलं होत. त्यांना दोघांनाही एक मुलगी असून तिचं नाव ‘आराध्या’ असं आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन याने आपल्या करिअरची सुरुवात 2000 मध्ये आलेल्या ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून केली. करीना कपूरने देखील याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर जास्त नाही चालला. पण वास्तवात पाहायला गेलं, तर हा चित्रपट त्या वर्षातला सर्वात जास्त कमाई करणारा 5 व्या क्रमांकाचा चित्रपट होता.

सन 2010 पासून अभिषेकचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नव्हते. परंतु 2018 च्या ‘मनमर्झिया’ या चित्रपटातून अभिषेकने कमबॅक केले.

नंतर त्याने डिजिटल प्लॅटफॉर्मला जास्त प्राधान्य दिलं.

https://www.instagram.com/p/CCbnFKnpbGv/?utm_source=ig_web_copy_link

‘ब्रीद’ या वेबसीरिजनंतर त्याला खूप लोकप्रियता मिळाली.

हेही वाचा-

हॅप्पी बड्डे भावा! ‘फुकरे’चा चूचा असो वा ‘छिछोरे’चा सेक्सा; प्रत्येक भूमिकेत वरुणने जिंकली चाहत्यांची मने

हॅपी बर्थडे उर्मिला: ‘रंगीला गर्ल’ ते राजकीय नेतृत्व; वाचा उर्मिला मातोंडकरचा थक्क करणारा जीवनप्रवास

हे देखील वाचा