Sunday, April 14, 2024

जेव्हा लीक झाले अक्षरा हासनचे प्रायव्हेट फोटो, तर ‘या’ कारणामुळे केलं होतं अभिनेत्रीने धर्मपरिवर्तन

श्रुती हासनची बहीण अक्षरा हासन ही देखील तिच्याप्रमाणे एक अभिनेत्री आहे. वडील कमल हासन यांच्या पावलावर पाऊल ठेवत या दोघी अभिनय क्षेत्रात नाव कमवत आहेत. अक्षरा अभिनय करत असली तरीही अद्याप तिला बहीण श्रुती हासन इतकी प्रसिद्धी मिळू शकली नाही.  गुरूवारी (12 ऑक्टोबर) अक्षरा तिचा वाढदिवस साजरा करते. यानिमित्ताने जाणून घेऊयात तिच्याबदद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी…

अक्षराचा जन्म 12 ऑक्टोबर 1991 रोजी चेन्नई येथे झाला. चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणाऱ्या अक्षराने सहाय्यक दिग्दर्शनही केले आहे.  अमिताभ बच्चन यांच्या ‘शमिताभ’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दक्षिण अभिनेत्री अक्षरा हासन आज तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. (happy birthday akshara haasan private photos leaked when it was being viral on internet)

अक्षरा हासनने बॉलिवूडमध्ये तिचा दुसरा चित्रपट ‘लाली की शादी में लड्डू दिवाना’ केला आणि त्यानंतर ती परत कॉलिवुडमध्ये सक्रिय झाली. तिथे तिने अजित कुमारसारख्या सुपरस्टारसोबत ‘विवेगम’ चित्रपटात काम केले. अमिताभ यांच्यासोबत डेब्यू केल्यानंतरही अक्षराला फारसे यश मिळाले नाही. शिवाय वादांशी तिचं जुनं नात आहे.

काही वर्षांपूर्वी अक्षरा हासनचे काही प्रायव्हेट फोटो इंटरनेटवर लीक झाले होते. या फोटोंमध्ये अक्षरा अंडरगार्मेंटमध्ये सेल्फी घेताना दिसली होती. या घटनेने ती खूप घाबरली होती. अक्षराचे प्रायव्हेट फोटो लीक झाल्यानंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड तनुज विरवानीची चौकशी सुरू झाली.

स्वतःला नास्तिक म्हणणाऱ्या अक्षरा हासनने, 2017 मध्ये आपला धर्म बदलला. तिने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारली होता. धर्मांतराबाबत अक्षरा म्हणाली की, तिने स्वतः बौद्ध धर्मावर विश्वास ठेवल्यानंतर हे पाऊल उचलले आहे.

अक्षराने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या. ती एक उत्तम अभिनेत्री तसेच स्क्रीन रायटर देखील आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्री सारिकाची मुलगी आहे. तर श्रुती हासन ही अक्षराची मोठी बहीण आहे. श्रुती एक बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री आहे.

अक्षरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर आगामी काळात तिचे ‘अग्नी सिरागुगल’ आणि ‘ज्वाला’ हे दाक्षिणात्य चित्रपट रिलीझ होणार आहेत.

हेही नक्की वाचा-
‘या’ प्रसिद्ध गायिकेच्या वडिलांना आणि भावाला अटक; अनैतिक संबंधातून केली चुलत भावाची ह’त्या
‘माझे हिरो, आयकॉन…’रितेश देशमुखची ‘बिग बीं’साठी खास पोस्ट; जुना फोटो व्हायरल

हे देखील वाचा