Wednesday, July 3, 2024

लहान वयात पालकांना गमावलेल्या अर्शदने स्वबळावर निर्माण केले आपले विश्व,’सर्किट’ने बदलले आयुष्य

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत,ज्यांनी खूप मेहनतीने काम मिळवले आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला त्यांनी पायदळी तुडवून आपल्या यशाचा मार्ग काढला आहे. पण त्यांची मेहनत बघून यश देखील त्यांच्यापुढे झूकले. आज ते एक लोकप्रिय कलाकार म्हणून सर्वत्र मिरवताना दिसणार. यात याचा समावेश होतो म्हणजे बॉलीवूड कलाकार अरशद वारसी. आता अरशद बॉलिवूडमधील नावाजलेला अभिनेता आहे.

अगदी लहान वयात त्याच्या डोक्यावरील त्याच्या आई-वडिलांचे छत्र हरवले आणि तिथून पुढे सुरु झाला तो त्याचा खडतर प्रवास. अनेक संकटांवर मात करत त्याने जी मजल मारली आहे, ती वाखणण्या जोगी आहे. अरशदने नुकताच आपला 54 वा वाढदिवस साजरा केला आहे. जाणून घेऊया त्याच्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल.

शिक्षण सोडल्यावर त्याने एका कॉस्मेटिक कंपनीमध्ये सेल्समॅन म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याचे वय होते केवळ 17 वर्ष. काम करता करता त्याला डान्समध्ये खूपच आवड निर्माण झाली आणि तिथून पुढे त्याने डान्स शिकायला सुरुवात केली. त्याचे हे टॅलेंट बघून त्याला अकबर समी या डान्स ग्रुपमध्ये येण्याची संधी मिळाली. 1987 मध्ये त्याला ‘ठिकाणा’ आणि ‘काश’ या चित्रपटातील गाण्यांना कोरियोग्राफ करण्याची संधी मिळाली.

त्यानंतर त्यांनी 1996 मध्ये ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटात काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यानंतर 2003 मध्ये आलेला त्याचा चित्रपट त्याचा करिअरचा एक टर्निंग पॉइंट ठरला. राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाने त्याला त्याला सर्वत्र ओळख निर्माण करून दिली. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सगळ्यात सुपरहिट चित्रपट आहे. यासोबत त्याने इश्किया, ढेड इश्किया, गुड्डू रंगीला, फ्रॉड सय्या, भैय्याजी सुपरहिट, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून त्याचे नाव कमावले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा