Tuesday, June 25, 2024

वाढदिवस विशेष! ‘कथ्थक’ नृत्यामधील मेरुमणी म्हणजेच पंडित बिरजू महाराज; वाचा त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी

भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये भरतनाट्यम, कथक, मोहिनीभट्टम आणि कुचीपुडी यांचा समावेश होतो. यातील ‘कथ्थक’ या शास्त्रीय नृत्याचे सम्राट ब्रिजमोहन मिश्रा म्हणजेच ‘पंडित बिरजू महाराज’ हे आज आपला ८३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्याशिवाय ‘कथ्थक’ची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी, १९३८ रोजी उत्तरप्रदेशच्या लखनऊमध्ये झाला होता. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

यांच्याकडून घेतले प्रशिक्षण
बिरजू महाराज यांना त्यांचे मामा लच्छू महाराज, शंभू महाराज आणि त्यांचे वडील अचन महाराज यांनी ‘कथ्थक’चे प्रशिक्षण दिले. बिरजू महाराजांनी शास्त्रीय नृत्याच्या जगात नाव कमावून कौटुंबिक वारसा पुढे आणला. 

विशेष म्हणजे त्यांनी त्यांचे पहिले नृत्य सादरीकरण हे अवघ्या ७ वर्षांचे असताना केले होते. वयाच्या १३ व्या वर्षी बिरजू महाराज यांनी नवी दिल्ली येथील ‘संगीत भारती’मध्ये नृत्य प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. यानंतर ते ‘भारतीय कला केंद्रा’मध्ये नृत्य शिकण्यासाठी उत्सुक असलेल्यांना प्रशिक्षण देण्यास गेले.

शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांचे गाणे केले कोरिओग्राफ
बिरजू महाराज हे प्रसिद्ध नृत्य कलाकारासोबतच एक सुंदर गायक आणि संगीतकारही आहे. त्यांनी सत्यजित रे दिग्दर्शित ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटात आपला आवाजही दिला आहे. यासोबतच त्यांनी शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित अभिनित ‘देवदास’ चित्रपटात ‘काहे छेड छेड मोहे’ गाणे कोरिओग्राफ केले होते. यासोबतच त्यांनी ‘गदर’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘दिल तो पागल है’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली आहे.

‘या’ पुरस्कारांनी केले सन्मानित
बिरजू महाराजांनी आपल्या कलेने अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले. त्यांनी ‘विश्वरूपम’ या चित्रपटासाठी हुजैफचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जिंकला. यासह त्यांना ‘संगम कला पुरस्कार’, ‘आंध्रा रत्न’, ‘सोव्हियत लँड नेहरू पुरस्कार’, ‘राजीव गांधी सद्भावना पुरस्कार’ आणि ‘पद्मविभूषण’ यांसारख्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते. या व्यतिरिक्त सन २०१६ मध्ये त्यांना बाजीराव मस्तानीमधील ‘मोहे रंग दो लाल’ गाणे कोरिओग्राफ केल्यामुळे फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

नव्या पिढीला देतात धडे
बिरजू महाराज शक्य होईल तितके नव्या पिढीला नृत्याचे धडे देण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी ‘कलाश्रम’ नावाने दिल्ली येथे नृत्य शाळा सुरू केली आहे. यामध्ये अनेकजण या महान शास्त्रीय नृत्य सम्राटाकडून धडे घेतात.

हे देखील वाचा