आत्ताची सर्वात टॉपची हिरोईन म्हणून दीपिका पदुकोण ओळखली जाते. तिला हे स्थान गाठण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे. अनेक वर्ष संघर्ष करून दीपिकाने या बेभरवशाच्या मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे स्थान कायमस्वरूपी पक्के केले. कोणताही ठोस पाठिंबा किंवा मार्गदर्शक नसतानाही दीपिकाने फक्त आत्मविश्वास आणि मेहनतीने यश संपादन केले. तुम्हाला माहिती आहे का की, दीपिका आजची आघाडीची आणि महागडी अभिनेत्री असली तरी एकेकाळी ती डिप्रेशनमध्ये होती.
दीपिका नैराश्यात गेली ते साल होते २०१४. २०१४ पर्यंत तिने ओम शांती ओम, कॉकटेल, चेन्नई एक्सप्रेस, ये जवानी हैं दिवाणी, हैप्पी न्यू इयर, आरक्षण, रामलीला असे अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. दीपिकाने तेव्हा तिचे सिनेसृष्टीतले स्थान पक्के केले होते. तरीही तिला निराश्यासारख्या आजाराचा सामना करावा लागला.
दीपिकाने २०१५ साली एका मुलाखतीदरम्यान तिच्या या आजारबद्दल सांगितले होते. ती म्ह्णणाली, ” मी डिप्रेशनमध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यातील कारणामुळे गेली होती. दीपिकाने रणबीरचे नाव न घेता म्हटले होते की, ‘मला माझ्या जवळच्या व्यक्तीने प्रेमात धोका दिला होता. माझ्यासोबत रिलेशनमध्ये असताना त्याने आणखी एका व्यक्तीसोबत नाते जोडले होते. जे मी स्वत:च्या डोळ्याने पाहिले. मी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला होता. कधी कोणाबाबतीत इतके प्रेमळ असू नये. या घटनेच्या माझ्या मनावर आणि आयुष्यावर खूप वाईट नकारत्मक परिणाम झाला.’
‘डोकयात सतत विचार येत असल्याने मी स्वतःला कामात बिझी ठेवत होते. मात्र एका पॉइंटला आल्यावर मला कळून चुकले की मी डिप्रेशनमध्ये जात आहे. तेव्हा मी डॉक्टरांचा सल्ला घेत उपचार घ्यायला सुरुवात केली. सुदैवाने आणि माझ्या इच्छाशक्तीच्या जोरावर मी काही काळातच यातून बाहेर यायला लागली. काही महिन्यांनी मी पूर्ण बरी झाली. मला साधारण सहा महिन्यांचा कालावधी लागला यातून बाहेर यायला. मात्र यादरम्यान मला काही गोष्टी कळल्या. मी जेव्हा माझ्या आजराबद्दल अभ्यास करायला लागली तेव्हा मला समजले की आपल्या देशात नैराश्य हा असा आजार आहे ज्यावर खूप कमी बोलले जाते, त्याची माहिती देखील खूप कमी लोकांना आहे. यासाठी मी एक फाउंडेशन काढायचे ठरवले. ज्यात डिप्रेशन बद्दल सर्व माहिती मिळून तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल. मग मी लिव्ह, लव्ह, लाफ फाउंडेशनची स्थापना केली. आजारातून बाहेर येण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द आणि सकारात्मकता आवश्यक असते,’ असेही ती म्हणाली होती.
दीपिकाच्या या आजारांनंतर तिने जोरदार कमबॅक केले. त्यानंतर तिने पिकू सिनेमा केला. ज्यासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रींचे फिल्मफेयरचे पारितोषिक देखील मिळाले.