Friday, March 29, 2024

प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घ्या त्यांच्या गझल्सबद्दल

गुलाम अली यांच्या गझल आणि गाण्याचे लाखो चाहते आहेत. प्रत्येक प्रेक्षक आणि लोकांवर त्यांनी  त्यांच्या मधुर आवाजाचा आणि त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडला आहे. गुलाम अली यांना जगभरातील लोकं गझल गायक म्हणून ओळखतात. भारतीय शास्त्रीय संगीताचे विद्यापीठ असणारे गुलाम अली आज त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करत आहे. गुलाम अली हे पटियाला घराण्याचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. 

गुलाम अली यांचा जन्म ५ डिसेंबर १८४० साली पाकिस्तान येथे झाला. त्यांनी ज्येष्ठ गुलाम अली साहेबांकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले. कवीला नेहमीच त्याच्या अनेक कवितांमधून एक कविता अमर करते. त्याच प्रकारे काही गझल त्या गायकांना लोकांच्या हृदयात जिवंत ठेवते. त्यांच्या प्रत्येक मैफिलमध्ये गुलाम आली यांना नेहमीच प्रेक्षकांकडून त्यांची सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध गझल ‘हम तेरे शहर में आये है मुसाफिर की तरह’ गाण्यास सांगितले जाते.

हम तेरे शहर मे आये है मुसाफिर की तरह, हंगामा क्यों बरपा,चमकते चांद को टूटा हुआ तारा बना डाला, चुपके चुपके रात दिन, हमको किसके गम ने मारा आदी अनेक गझल्सने त्यांना प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले.

गुलाम अली यांना पाकिस्तान आणि भारतात प्रचंड प्रेम मिळाले. त्यांच्या गाण्यांवर देखील दोन्ही देशांमधील प्रेक्षकांनी अमाप प्रेम दिले. त्यांनी प्रथम पाकिस्तानी रेडिओसाठी गाणे गायले. कालांतराने ते प्रसिद्ध झाले आणि त्यांनी संपूर्ण जगाला त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध केले. हसरत मोहनी, ‘अकबर इलाहबादी’ यांसारख्या दिग्गज उर्दू कवींच्या गझलांसह ते स्वलिखीत गझलही गात आले आहेत.

त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील गझल गायल्या. त्यांची ‘चुपके चुपके रात दिन’ ही गझल तुफान गाजली. त्यांच्या त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठमोठ्या पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा