हॅपी बर्थडे जयदीप! सैन्यात भरती होऊन करायचे होते देशाचे रक्षण; नापास झाल्याने अभिनयाच्या दिशेने वळवला मोर्चा

Happy Birthday Jaideep Ahlawat A Look At His Careers Some Finest Performance


बॉलिवूड अभिनेता जयदीप अहलावत आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९८० रोजी हरयाणाच्या रोहतकमध्ये झाला होता. अनेक व्यक्तींप्रमाणे त्यांनाही सैन्यात भरती होऊन देशाचे रक्षण करायचे होते. परंतु अनेकवेळा एसएसबी परिक्षेत नापास झाल्याने त्यांनी आपला मोर्चा अभिनयाच्या दिशेने वळवला. जयदीप यांनी सन २००८ मध्ये एफटीआयमधून अभिनयात पदवी शिक्षण पूर्ण केले. पंजाब आणि हरयाणामध्ये काही स्टेज शो केल्यानंतर ते बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी मेहनत करू लागले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील काही अभिनयाच्या दमदार कामगिरीबद्दल जाणून घेणार आहोत.

कमांडो: अ वन मॅन आर्मी (AK ४७)
सन २०१३ साली प्रदर्शित झालेला दिलीप घोष दिग्दर्शित ‘कमांडो: अ वन मॅन आर्मी’ सिनेमात अभिनेता विद्युत जामवालच्या अफलातून स्टंट्सने चाहत्यांची मने जिंकली होती. परंतु या सिनेमात आणखी एका व्यक्तीने खास कामगिरी केली होती. ते व्यक्ती म्हणजेच जयदीप अहलावत. चित्रपटात जयदीप यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना एकदम थक्क केले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

गँग्स ऑफ वासेपूर: (शाहिद खान)
सन २०१२ साली प्रदर्शित झालेला अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमा आणि यातील कलाकार कोणीही विसरू शकणार नाही. विशेष म्हणजे या सिनेमात जयदीप अहलावत यांनी शाहिद खानची भूमिका चोख पार पाडली. हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

गब्बर इझ बॅक: (सीबीआय अधिकारी कुलदीप पाहवा)
जयदीप अहलावत यांनी केवळ आपल्या नकारात्मक भूमिकाच केल्या नाही, तर प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिकादेखील तितक्याच चांगल्याप्रकारे पार पाडली. सन २०१५ मध्ये क्रिश दिग्दर्शित ‘गब्बर इझ बॅक’ सिनेमात त्यांनी प्रामाणिक सीबीआय अधिकारी कुलदीप पाहवाची भूमिका साकारली होती. त्यांनी यामध्येही आपल्या अभिनयाने चाहत्यांचे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे या सिनेमाने १०० पेक्षाही अधिक कोटींची कमाई केली होती.

पाताल लोक: (हाथीराम चौधरी)
जयदीप अहलावत यांचं नाव घेतलं की सर्वात पहिलं नाव येतं ते मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पाताल लोक’ या वेब सीरिजचं. या सीरिजमध्ये जयदीप यांनी पोलीस अधिकारी हाथीराम चौधरीची भूमिका साकारली होती. ही वेब सीरिज सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली होती.

विशेष म्हणजे अनेक सेलिब्रिटी लॉकडाऊनदरम्यान ही वेब सीरिज पाहण्याचा आनंद लूटत होते. ही वेब सीरिज ब्लॉकबस्टर ठरली होती.

राझी: (खालिद मीर)
सन २०१८ साली प्रदर्शित झालेला मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ सिनेमाही चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. या सिनेमात जयदीप अहलावत यांनी खालिद मीर ही भूमिका साकारली होती.

हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता.

हेही वाचा-

अखेर प्रतिक्षा संपली.! बहुचर्चित ‘केजीएफ चॅप्टर 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार रिलीज


Leave A Reply

Your email address will not be published.