अखेर प्रतिक्षा संपली.! बहुचर्चित ‘केजीएफ चॅप्टर 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार रिलीज

अखेर प्रतिक्षा संपली.! बहुचर्चित 'केजीएफ चॅप्टर 2' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; 'या' दिवशी होणार रिलीज


बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘केजीएफ च‌ॅप्टर २’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१८ मध्ये केजीएफ चित्रपट रीलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तेव्हापासूनच या चित्रपटाच्या भाग-२ ची प्रेक्षकांना आतुरता लागली होती.

चित्रपटाच्या दुसर्‍या भागात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय दत्त मुख्य व्हिलनच्या भुमिकेत दिसणार आहे. त्याचा पोस्टरही रीलीज करण्यात आला होता. त्यामुळे पोस्टर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

जुलै महिन्यात १६ तारखेला हा चित्रपट प्रदर्शीत होणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता अभिनेता यशचे चाहते आणि केजीएफ चित्रपटाच्या सर्वच प्रेक्षकांना १६ जुलै २०२१ चे वेध लागले आहेत.

कन्नड भाषेतील सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार यश आणि बॉलिवूडमधील स्टार संजय दत्त अभिनीत ‘केजीएफ चॅप्टर 2’ चित्रपटासाठी आता अवघे काही महिने उरले आहेत, असे म्हणता येईल. खरे तर हा सिनेमा गेल्या वर्षी रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे याचे शूटिंग होऊ शकले नव्हते. मात्र, कोरोनानंतर शूटिंगला परवानगी देताच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले.

‘केजीएफ चॅप्टर 2’ आता लवकरच देशभरात पाच भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. केवळ साऊथच नव्हे तर उत्तर भारतातही या सिनेमाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.