Tuesday, July 9, 2024

प्रसिद्ध बँड ‘बीटीएस’चा लीडर आहे २७ वर्षीय किम नामजून; ‘या’ कारणामुळे बदलले आपले स्टेज नेम

लोकप्रिय पॉप बँड बीटीएस लीडर आरएम म्हणजेच किम नामजून रविवारी (१२ सप्टेंबर) आपला २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. किम नामजून हा या बँड गटात निवडला गेलेला पहिलाच रॅपर आहे. तेव्हापासून तो आतापर्यंत बँडचे नेतृत्व करत आहे. या बँडमध्ये त्याला रॅप मॉन्स्टर या स्टेज नावाने लाँच करण्यात आले होते.

परंतु २०१७ मध्ये, किमने घोषणा केली की, तो रॅप मॉन्स्टर नाव वापरणे थांबवेल आणि त्याऐवजी आरएम स्टेज नाव वापरेल. किमने बीटीएसच्या अधिकृत फॅन कॅफेला त्याच्या स्टेजचे नाव बदलण्याबद्दल एक पत्र पोस्ट केले. किमने स्पष्ट केले की, आरएम नाव त्याने बनवलेल्या संगीताशी अधिक सुसंगत आहे. यासह हे नाव देखील त्यांना एक व्यापक पोहोच देते.

किमने सांगितले की, “मी २०१२च्या अखेरीपासून रॅप मॉन्स्टर या नावाचा प्रचार करत आहे. हे एक स्टेज नाव होते. जे एका गाण्याच्या ओळीनंतर माझ्या कंपनी आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये लोकप्रिय झाले. ‘बीटीएस रॅप मॉन्स्टर’ हे नाव थोडा मोठं होतं. तसेच हे नाव मी गेल्या पाच वर्षांपासून करत असलेल्या गाण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. म्हणून मी रॅप मॉन्स्टरच्या पूर्ण नावाऐवजी स्वत:ला रॅपमॉन किंवा आरएम हे नाव लावण्याचा निर्णय घेतला.”

किम पुढे म्हणाला की, “मी आधीच काही संगीत आणि मिक्सटेप्स आरएम म्हणून प्रदर्शित केले आहेत. त्यामुळे मला वाटते की, काही चाहत्यांनी आधीच अंदाज लावला असावा. मी बराच काळ याबद्दल विचार केला, कारण मला भविष्यात बराच काळ खुल्या मनाने संगीत बनवायचे आहे.”

किम म्हणाला की, “मला माहित आहे की, माझे स्टेजचे नाव बदलणे थोडे विचित्र आहे. कारण माझ्या पदार्पणाच्या दिवसांपासून मला या नावाने हाक मारली जात आहे. परंतु, मला आशा आहे की, दीर्घकाळ विचारविनिमयानंतर घेतलेल्या माझ्या निर्णयाचे तुम्ही स्वागत कराल.”

आरएमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, बीटीएसचे चाहते सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी किमने स्वतःचे तीन फोटो ट्विटरवर कृतज्ञता व्यक्त करताना शेअर केले. तसेच त्याने त्याच्या चाहत्यांचे त्याच्यावरील प्रेमाबद्दल आभार मानले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट

-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक

-कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा

हे देखील वाचा