Saturday, December 7, 2024
Home कॅलेंडर चित्रपटांनी समृद्ध असणाऱ्या महेश भट्ट यांच्या करिअरला वादांमुळे लाभली काळी किनार

चित्रपटांनी समृद्ध असणाऱ्या महेश भट्ट यांच्या करिअरला वादांमुळे लाभली काळी किनार

बॉलिवूडमध्ये अनेक दिग्दर्शक निर्माते आहेत, मात्र काही दिग्दर्शक हे त्यांच्या चित्रपटांइतकेच त्यांच्या वादांसाठी प्रसिद्ध आहेत. विवादित बोलणे, विवादित पोस्ट करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेली चुकीची वागणूक, वैयक्तिक कारणांमुळे आदी अनेक कारणांमुळे काही दिग्दर्शक कायम चर्चेत असतात. असे एक दिग्दर्शक म्हणजे महेश भट्ट. बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देणारे, अनेक कलाकारांना संधी देणारे महेश भट्ट कायम त्यांच्या कामापेक्षा अधिक वादांमुळे स्मरणात राहतात. महेश भट्ट यांनी एक दिग्दर्शक म्हणूनच या क्षेत्रात पदार्पण केले.आज महेश भट्ट त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया त्यांच्याबाबत काही खास माहिती..

महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचा जन्म 20 सप्टेंबर1948रोजी मुंबईत झाला आज महेश भट्ट त्यांचा 74वा वाढदिवस साजरा करत आहे. महेश भट्ट यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, त्यांच्या आई-वडिलांचे विधीवत लग्न झाले नव्हते. त्यामुळे ते एक अनौरस अपत्य आहे. ते मी एका एकट्या शिरीन मोहम्मद अली या मुस्लिम स्त्रीचे अनौरस मूल होते. पुढे त्यांनी सांगितले की, त्यांना वडील कसे असतात हेच माहित नव्हते. त्यांच्याकडे माझ्या वडिलांबद्दलची एकही आठवण नाही. त्यांचे वडील नानाभाई भट्ट हे त्यांच्यासाठी असूनही नसल्यासारखेच होते. कदाचित याच कारणामुळे महेश भट्ट यांचा विवाहसंस्थेवर विश्वास नाही आणि ते त्याला फार महत्त्वही देत नाहीत.

शाळेत असतानाच महेश भट्ट यांनी त्यांच्या उन्हाळाच्या सुट्टीत काम करायला सुरुवात केली होती. हे काम करत असताना त्यांचा या सिनेजगाशी संपर्क झाला. या सुट्ट्यांमध्ये ते जाहिराती देखील तयार करायचे. त्यांनी केवळ २६व्या वर्षी अर्थात 1974साली दिग्दर्शक म्हणून ‘मंजिले और भी हैं’ या सिनेमाद्वारे दणक्यात पदार्पण केले. या सिनेमात अभिनेत्री शबाना आझमी आणि अभिनेता विनोद खन्ना मुख्य भूमिकांमध्ये होते. हा सिनेमा हिट तर झाला सोबतच त्या वर्षी सिनेमाला 2 फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले. यशस्वी पदार्पण केलेल्या महेश यांनी पुढे सारांश, सडक, आशिकी, जख्म, दिल है की मानता नही, राज, मर्डर, असे अनेक उत्कृष्ट सिनेमे तयार केले. चित्रपटांनी त्यांचे करियर अतिशय समृद्ध केले होते, मात्र वैयक्तिक आयुष्य आणि अफेयर्समुळे त्यांच्या या समृद्ध करियरला एक काळी किनार लाभली आहे.

महेश वयाच्या विशीतच पहिल्यांदा प्रेमात पडले. ते जिच्या प्रेमात पडले ती होती लोरिए ब्राईट. महेश भट यांच्याशी लग्न केले आणि लग्नानंतर लोरिए ब्राईटने तिचे नाव बदलून किरण भट ठेऊन घेतले. महेश आणि लोरिए यांना पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन मुलं आहेत. किरणसोबत सर्व सुरळीत सुरु असतानाच महेश भट यांच्या आयुष्यात अभिनेत्री परवीन बाबी यांची एन्ट्री झाली. महेश आणि परवीन बाबी यांच्या अफेअरच्या इंडस्ट्रीमध्ये आणि मीडियामध्ये चर्चा रंगू लागल्या. या बातम्यांनी किरण यांना मोठा धक्का बसला आणि त्यांचा संसार मोडला.

पुढे काही काळाने त्यांनी त्यांच्या पत्नीला किरणला सोडून परवीन बाबीसोबत लिव्ह इनमध्ये राहण्यास सुरुवात केली. मात्र या नात्याचा शेवट खूपच दु:खद आणि वेदनादायी ठरला. महेश भट यांच्यासोबत नात्यात असतानाच परवीन या पॅरनॉईड स्क्रिझोफेनिया या मानसिक आजाराने ग्रासले. आपल्याला कोणतीरी मारून टाकणार, अशी भीती त्यांना सतत जाणवायची त्यांना वेगवेगळे भास व्हायचे. या कृशल काळात महेश भट यांनी परवीन यांना खूप साथ दिली त्यांना सांभाळले. पण दिवसेंदिवस परवीन यांचा आजार वाढला आणि फिलॉसफरच्या सल्ल्यावर महेश भट परवीन यांच्यापासून वेगळे झाले.

परवीन बाबीसोबतचे नाते संपल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सोनी राजदान आल्या. विशेष बाब म्हणजे सोनी राजदानसोबत त्यांच्या सुरु असणाऱ्या अफेअरदरम्यानही ते त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत किरणसोबत एकत्र राहत होते. पुढे त्यांनी किरणला घटस्फोट न देताच सोनी राजदानसोबत लग्न केले. 1986 साली या दोघांचे लग्न झाले. त्यांना शाहीन भट्ट आणि आलिया भट या दोन मुली आहेत.

महेश भट्ट यांचे अफेयर तर भरपूर रंगले सोबतच त्यांचे वक्तव्य देखील मीडियामध्ये चर्चेही विषय ठरले आणि वादही निर्माण करून गेले. त्यांच्या असाच एक वाद जो सर्वात जास्त गाजला तो म्हणजे त्यांची मुलगी असणाऱ्या पूजा भट्टसोबतचा लिपलॉक सीन. या दोघांचा लिपलॉक करतानाच एक फोटो समोर आला आणि तुफान वाद उफाळला. एका मासिकात महेश भट्ट पूजाला किस करत असतानांचा फोटो छापला होता. या फोटोमुळे प्रचंड खळबळ उडाली. या फोटोवर स्पष्टीकरण देताना महेश म्हणाले होते की,’पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केले असते’, त्यांच्या या वक्तव्याची प्रचंड निंदा झाली होती.

मागील वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्या नात्यावर प्रश्न निर्माण झाले होते. याच काळात दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि महेश भट्ट यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ते दोघे एकमेकांचा हात धरून जवळ उभे होते. शिवाय व्हिडीओमध्ये ते हसून बोलताना सुद्धा दिसले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर महेश भट्ट टीकेचे धनी झाले होते.

बॉलिवूडची पंगा क्वीन असणाऱ्या कंगना रानौतच्या बहिणेने रंगोलीने महेश भट्ट यांच्यावर अनेक आरोप केले होते. या आरोपांमध्ये तिने महेश भट्ट यांच्यावर कंगनासोबत गैरवर्तन केल्याचे सांगितले होते. ‘वो लम्हे’ चित्रपटाच्या वेळेला महेश भट्ट यांनी कंगनाला वेडी म्हटले होते आणि तिला चप्पल फेकून मारली होती. शिवाय त्यांनी तिला तिच्याच सिनेमाच्या प्रदर्शनाला जाऊ दिले नव्हते. हे खुद्द कंगनानेच एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

हेही नक्की वाचा-
मुस्लीम आई, विवाहबाह्य संबंध आणि स्वतःच्याच मुलीसोबत… ‘या’ प्रकरणांनी वादात सापडले होते महेश भट्ट
‘मी मेल्यावर त्यांना आनंद होईल…’ कुटुंबाबाबत महेश भट्ट यांनी केला मोठा खुलासा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा