Saturday, July 6, 2024

बॅकग्राऊंड डान्सर ते टेलिव्हिजन, बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या मौनीला करावा लागला टीकेचा सामना

मनोरंजनाच्या जगात अभिनेत्री होणे किंवा स्वतःला सिद्ध करणे वाटते तितके अजिबात सोपे नाही. प्रतिभा असूनही कधीकधी केवळ संधी न मिळाल्यामुळे अनेक लोकं हार मानून माघारी जातात. मात्र ज्याला इथेच काम करायचे आहे, तो कसेही करून काम मिळवतोच. पहिल्याच झटक्यात मुख्य भूमिका मिळाली नाही, तरी जे वाट्याला येईल ते काम करत आपल्या उद्देशाच्या दिशेने प्रवास सुरु करतात. बॉलिवूडमध्ये किंवा टेलिव्हिजन क्षेत्रात नजर टाकली तर आपल्याला असे अनेक कलाकार दिसतील ज्यांनी कलाकार होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने या क्षेत्रात आले आणि आज येथे त्यांचे स्थान निर्माण केले.

अशीच एक अभिनेत्री आहे मौनी रॉय. आज मौनी बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. टेलिव्हिजनपासून सुरु झालेला मौनीचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. आज (२८ सप्टेंबर) मौनी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या या अभिनयप्रवासाबद्दल. 36वा वाढदिवस साजरा करत आहे.

मौनीचा जन्म २८ सप्टेंबर १९८५ रोजी पश्चिम बंगालच्या कूच बिहार येथे झाला. तिचे आजोबा आणि आई रंगभूमीवरील कलाकार होते. तिने बारावी पास केल्यानंतर दिल्लीमध्ये जामिया मिलिया इस्लामियाच्या जनसंवाद कोर्समध्ये पत्रकारितेचे शिक्षण सुरु केले. मात्र थोडा काळ त्याचा अभ्यास केल्यानंतर तिला बॉलिवूड खुणावू लागले. मग तिने तिचा अभ्यास अर्ध्यातच सोडून मुंबई गाठली.

मुंबईत आल्यानंतर तिच्या संघर्षाला सुरुवात झाली. तिने अभिषेक बच्चन, भूमिका चावला यांच्या ‘रन’ सिनेमात ‘नही होना’ गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून डान्स देखील केला. एकीकडे अभिनेत्री होण्याचा संघर्ष सुरु असतानाच तिला एकता कपूरच्या सुपरहिट अशा ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून तिने अभिनयाच्या आणि टेलिव्हिजनच्या विश्वात पाऊल टाकले. या मालिकेत तिने ‘कृष्णा तुलसी’ ही भूमिका तिने साकारली, आणि तिचा अभिनय प्रवास सुरु झाला.

पुढे तिने ‘कस्तूरी’ आणि ‘पति पत्नी और वो’ या मालिकांमध्ये काम केले. तर तिला खरी ओळख ‘देवों के देव महादेव’ या मालिकेतील सतीच्या भूमिकेतून मिळाली. या मालिकेतील तिने साकारलेली सती चांगलीच लोकप्रिय झाली. त्यांनतर ती ‘नागिन’, ‘नागिन २’, ‘नागिन ३’, ‘टशन-ए-इश्क’, ‘जूनून’, ‘ऐसी नफरत तो कैसा इश्क’, ‘कृष्णा चली लंदन’, ‘झलक दिखला जा ९’, ‘एक था राजा एक थी रानी’ आदी मालिकांमध्ये झळकली. यातील तिने साकारलेली ‘नागीन’ मालिकेतील ‘नागीन’ ही भूमिका तुफान गाजली.

मौनीने तिच्या १४ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक यश आणि अपयश पाहिले. २०१८ साली तिने रीमा जागती यांच्या ‘गोल्ड’ या सिनेमातून अक्षय कुमारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली. बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत तिने काम केले आहे. आज मौनीला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. मात्र मध्ये एकदा तिने ओठांची आणि आयब्रोची सर्जरी केल्यामुळे तिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.

मौनाचे नेटवर्थ ८ कोटी रुपयांचे असून, ती एका शोसाठी ३०/४० लाख रुपये घेते. नुकतेच तिने एक आलिशान घर खरेदी केले आहे. आगामी काळात मौनी आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दिसणार आहे.

 

 

हे देखील वाचा