Wednesday, February 21, 2024

तीन प्रसिद्ध अभिनेत्यांशी अफेअर असूनही मिळाले नाही खरे प्रेम, आजही अविवाहित आहे राणी चॅटर्जी

बॉलिवूड विश्वात मोठ्या प्रमाणात अफेअरच्या चर्चा होत असतात. मात्र, आता या बाबतीत भोजपुरी इंडस्ट्री देखील मागे राहिली नाही. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये देखील या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. अभिनेत्री राणी चॅटर्जी हे भोजपुरीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ती जेव्हा जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा ती चाहत्यांची मने जिंकते. चाहत्यांनाही राणी खूप आवडते. राणी चॅटर्जी शुक्रवारी (3 नोव्हेंबर) आपला 34 वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या चित्रपटांची आणि अभिनयाची जितकी चर्चा होते तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. चला तर मग तिच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या अफेअरबद्दल जाणुन घेऊया.

भोजपुरी ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखली जाणारी राणी तिच्या चित्रपट आणि अभिनयामुळे चर्चेत राहिली असली, तरी तिच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चाही कमी नाहीत. 3 नोव्हेंबर1989रोजी मुंबईत जन्मलेली राणी वयाच्या 34 व्या वर्षीही अविवाहित आहे. तीन अफेअर होऊनही तिला अजून खरे प्रेम मिळालेले नाही. अशा परिस्थितीत आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या लव्ह लाइफबद्दल जाणून घेऊया.

राणी याच वर्षी टीव्ही अभिनेता मनदीप बमरासोबत लग्न करणार होती. या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डेला तिने बॉयफ्रेंडवर प्रेम व्यक्त केले. तिच्या घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने खळबळ उडाली होती. याआधीही ही अभिनेत्री आणखी दोन अभिनेत्यांसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आली होती.

वयाच्या 16 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या राणीचे पवन सिंगसोबतचे अफेअरही चर्चेत आले होते. दोघांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. असे म्हटले जाते की, या दोघांची मने चित्रपटांच्या शूटिंगच्या सेटवर जुळली आणि दोन महिन्यांतच त्यांचे नाते तुटले.

एकदा एका मुलाखतीत, राणीने हावभावात सांगितले की, ती एका भोजपुरी अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तो तिला मारहाण करायचा. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यातच तिने त्याच्याशी संबंध तोडले. मात्र, ती कोणासाठी बोलली हे स्पष्ट होऊ शकले नाही. अनेक प्रसंगी ती पवन सिंगला सपोर्ट करताना दिसली होती.

याशिवाय राणी आणि रवी किशन यांच्या प्रेमाच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. एक काळ असा होता की, त्यांच्या जोडीने एकामागून एक हिट चित्रपट दिले. चित्रपटांमध्येही त्यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत होती. रील लाइफ असो वा रियल लाइफ, चाहत्यांनी तिच्यावर खूप प्रेम केले. एकदा रवी किशन आणि राणीचा एक व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो तिची किस घेताना आणि त्यांच्या लग्नाची जबाबदारी घेताना दिसला होता.

राणी चॅटर्जीच्या आयुष्यात आता कोणी नाही. ब्रेकअपनंतर ती खूपच तुटली होती, त्यानंतर तिने अनेक दुःखद पोस्ट्सही शेअर केल्या होत्या. ती खूपच तुटली होती आणि तिने एका पोस्टमध्ये ‘स्वतःवर प्रेम करा’ असेही म्हटले आहे. मनदीप आणि तिचे ब्रेकअप डेली रूटीनमुळे झाले असे म्हणतात. दोघेही एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-
‘यारियां’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेला हिमांश करायचा ‘रेडिओ जॉकी’ची नोकरी, नेहा कक्करवर होते जीवापाड प्रेम
‘एक दिवस ती नक्कीच माझी पत्नी होईल’, ‘अशी’ आहे ‘मिस इंडिया’ स्वरूप अन् परेश यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा