Saturday, June 29, 2024

‘जान तेरे नाम’मधून पदार्पण करणाऱ्या रोनित रॉयला, ‘या’ शोने मिळवून दिलीय खरी ओळख, वाचा

विविध पात्र साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता रोनित रॉय सोमवारी (11 ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याने प्रत्येक टप्प्यावर आपले टॅलेंट सिद्ध केले आहे. ‘जान तेरे नाम’ चित्रपटात एका निरागस मुलाची भूमिका साकारण्यापासून, त्याने अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. रोनितने अनेक हिट चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे, त्यामुळे त्याच्या अभिनयाने त्याला एका टॅलेंटेड अभिनेत्यांच्या यादीत आणले आहे. टीव्ही शो ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मध्ये तो मिहीरच्या भूमिकेत दिसला होता.’कसौटी जिंदगी की’ या शोमध्ये गर्विष्ठ मिस्टर बजाजच्या भूमिकेतही तो चाहत्यांना खूप आवडला. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल जाणून घेऊया.

चित्रपटसृष्टीत काम मिळणे नव्हते सोपे
रोनितला अभिनय करायचा होता, पण त्याला भूमिका मिळणे सोपे नव्हते. सुभाष घई यांनी त्याला समजावून सांगितले की, चित्रपटसृष्टीत काम मिळणे खूप कठीण आहे. म्हणून त्याने मुंबईच्या ‘सी रॉक हॉटेल’मध्ये प्रशिक्षणार्थीची नोकरी स्वीकारली. या नोकरीदरम्यान रोनितला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तो हॉटेलमध्ये भांडी धुण्यापासून टेबल साफ करण्यापर्यंत काम करत होता.

बऱ्याच संघर्षानंतर रोनितला १९९२ मध्ये ‘जान तेरे नाम’ मध्ये मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली. चित्रपट चांगला चालला पण रोनितच्या कारकिर्दीला हवी ती फ्लाईट मिळाली नाही. रोनितने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात ‘कमल’ या मालिकेने केली होती. चित्रपटांमध्ये भूमिका न मिळाल्यामुळे रोनितने टीव्हीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

अदालत
टीव्ही शो ‘अदालत’ हा गेम चेंजर आणि त्याच्या टेलिव्हिजन कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरला आहे. यामध्ये रोनितने केडी पाठकची भूमिका साकारली आणि त्याच्या चाहत्यांना त्याच्या टॅलेंटची दुसरी बाजू दाखवली. केवळ रोनितलाच नाही, तर या शोला देखील प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.

कहने को हमसफर है
अल्ट बालाजी वेबसीरिज ‘कहने को हमसफर है’ या शोमध्ये रोनितने नील खन्नाची भूमिका साकारली होती. त्यामध्ये तो अविश्वासू पतीच्या भूमिकेत दिसला होता. तर, यामध्ये गुरदीप कोहलीने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

हॉस्टेजेस
हा रोनितच्या यशस्वी प्रोजेक्टपैकी एक आहे. यामध्ये रोनितने एसपी पृथ्वी सिंगची भूमिका साकारली आहे. ज्याला तो त्याची सर्वात आव्हानात्मक भूमिका म्हणून वर्णन करतो. दुसऱ्या सत्रात त्याने आपल्या भूमिकेची पुनरावृत्ती केली आहे.

उडान
विक्रमादित्य मोटवानीच्या चित्रपटात रोनितने आपला सर्वोत्तम अभिनय दिला आहे. त्यामध्ये त्याने वडिलांची भूमिका साकारली, जो अनेकदा त्याच्या लहान मुलाच्या विरोधात उभा राहतो. रोनितच्या भैरव सिंगच्या भूमिकेला प्रचंड प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यावर्षी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

 

रोनितच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्याने दोन लग्न केली आहेत. रोनितने १९९१ मध्ये पहिले लग्न केले. रोनितला पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर रोनितने २००३ साली अभिनेत्री नीलम सिंगसोबत दुसरे लग्न केले होते. रोनित आणि नीलम यांना दोन मुलेही आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वाढदिवसाचे औचित्य साधून रकुलप्रीत सिंगने केला ‘या’ निर्मात्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा

अब्दू रोजिकने सांगितले त्याच्या शाळेतील वाईट अनुभव, कमी उंचीमुळे शाळेतून काढले होते बाहेर

हे देखील वाचा